सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांचे भाजपाकडून राजापूरात स्वागत

राजापूर | प्रतिनिधी : मुंबई गोवा महामार्ग चौपदरीकरणाची पहाणी करण्यासाठी शुक्रवारी रत्नागिरी दौऱ्यावर आलेल्या सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. रवींद्र चव्हाण यांनी राजापूरातही महामार्गाच्या कामाची पहाणी केली. यावेळी भाजपाच्या वतीने त्यांचे महामार्गावर एसटी डेपोसमोर जंगी स्वागत करण्यात आले.
ना. चव्हाण हे शुक्रवारी कोकण दौऱ्यावर होते. त्यांनी पोलादपूर पासून सिंधुदुर्ग पर्यंत पुन्हा एकदा महामार्ग चौपदरीकरणाच्या कामाची पहाणी केली. रत्नागिरीतुन पाली, लांजा व राजापूर अशी पहाणी करून ते पुढे सिंधुदुर्गला रवाना झाले.
राजापुरात ना. चव्हाण यांचे भाजपा जिल्हा सहकार आघाडीचे जिल्हा संयोजक व राजापूर अर्बन बँकेचे संचालक अनिलकुमार करंगुटकर यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष रविंद्र नागरेकर, शहर अध्यक्ष विवेक गुरव, जिल्हा कार्यकारीणी सदस्या सौ. शितल पटेल, युवा मोर्चा तालुका सरचिटणीस अरविंद लांजेकर, माजी युवा मोर्चा तालुका अध्यक्ष श्री. सुजित पारकर, प्रभाकर गुरव आदिंसह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
राजापुरात सायंकाळी उशीरा दाखल झालेल्या ना. चव्हाण यांनी राजापूरातील महामार्ग चौपदरीकरणाच्या कामाची पहाणी केली. यावेळी उपस्थितांनी ना. चव्हाण यांच्याकडे राजापूरातील रखडलेल्या कामाबाबत माहिती दिली. यावर ही कामे मर्गी लावली जातील असे ना. चव्हाण यांनी सांगितले.