दोडामार्ग : प्रतिनिधी
दोडामार्गचे माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक संतोष नानचे यांच्या मातोश्री सुनीता दिनकर नानचे (वय ७६) यांचे नुकतेच वृद्धापकाळाने निधन झाले. या पार्श्वभूमीवर राज्याचे मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री तथा पालकमंत्री ना. नितेश राणे यांनी नानचे कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.
यावेळी संतोष नानचे, राजन नानचे, जिल्हा बँक चेअरमन मनीष दळवी, जि. प. माजी उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर, दोडामार्ग नगराध्यक्ष चेतन चव्हाण, माजी जि. प. सभापती एकनाथ नाडकर्णी, तालुकाध्यक्ष दीपक गवस, माजी तालुकाध्यक्ष सुधीर दळवी, देवेंद्र शेटकर, पराशर सावंत, चंदू मळीक, आकांक्षा शेटकर, सुधीर म्हावळणकर आदी उपस्थित होते.













