वेंगुर्ले : प्रतिनिधी
वेंगुर्ले तालुक्यातील वायंगणी येथे वायंगणी ग्रामपंचायत तर्फे गुरुवार २० नोव्हेंबर रोजी ग्रामपंचायत कार्यालयात महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. लाइफ टाईम हॉस्पिटल, पडवे यांच्या सहकार्याने हे शिबिर होणार आहे.
या महा आरोग्य शिबिरामध्ये हृदयरोग तपासणी, जनरल सर्जरी सल्ला, नेत्रतपासणी, स्त्रीरोग तपासणी, अस्थिरोग तपासणी, तसेच न्यूरोलॉजी तपासणी यांसह विविध आरोग्यसेवा ग्रामस्थांना मिळणार आहेत. तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या संख्येने नागरिकांनी तपासण्या करून घ्याव्यात. असे आवाहन सरपंच अवि दुतोंडकर यांनी केले आहे.









