रत्नागिरी । प्रतिनिधी
नगर परिषदेसाठी नामनिर्देशन पत्रे सादर करण्याच्या शेवटच्या दिवशी रत्नागिरीत बंडाळी, बिघाडी, धक्के आणि आश्चर्यकारक असा अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस ठरणार हे आता स्पष्ट झाले आहे.
महायुतीकडून शिवसेनेच्या शिल्पा सुर्वे यांना नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी घोषित करण्यात आली आहे. तर उबाठा शिवसेनेकडून शिवानी सावंत माने या रिंगणात उतरणार आहेत. त्याचवेळी या जागेसाठी राष्ट्रवादी अजित पवार गटातून ज्येष्ठ नेते बशीर मुर्तुझा यांच्या पत्नी वहिदा मुर्तुझाही उमेदवारी अर्ज भरणार असल्याचे सांगितले जात आहे. त्याचवेळी माजी नगराध्यक्ष कार्यसम्राट अशी ओळख असलेले कै. उमेश शेट्ये यांच्या पत्नी आणि माजी उपनगराध्यक्ष उज्ज्वला शेट्ये राष्ट्रवादी शरद पवार गटातून मिरकरवाडा येथून तर त्यांचा मुलगा केतन शेट्ये उबाठा मधून अर्ज भरणार असल्याची चर्चा आहे.
भाजपाचे माजी नगरसेवक मुन्ना चवंडे, मेधा कुळकर्णी, राजू कीर हे भाजपच्या पदाधिकारी शिवसेनेतून अर्ज दाखल करणार आहेत
दुपारनंतर एकूणच चित्र स्पष्ट होईल










