जिल्हा परिषद सेवानिवृत्त शिक्षक आणि अधिकारी ह्यांचा स्नेह मेळावा संपन्न –

रत्नागिरी: 
रत्नागिरी  जि.प .से नि शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व अधिकारी ह्यांचा स्नेह मेळावा जिल्हाध्यक्ष श्री.प्रभाकर खानविलकर ह्यांच्या अध्यक्षतेखाली प्राथ. शिक्षक पतपेढी चिपळूण येथे संपन्न झाला.प्रथम चिपळूण तालुका अध्यक्ष श्री.प्रकाश शिंदे व सचिव श्री.चंद्रकांत जंगम यांनी उपस्थित मान्यवर पदाधिकारी यांचे शाल श्रीफळ देवून स्वागत केले.सन २०२३ पासून संघटनात्म केलेल्या कामाची माहिती जिल्हा संघटना नेते श्री.उदय शिंदे यांनी सभागृहाला दिली.सदर मेळाव्याला सुमारे २०० सेवानिवृत्त शिक्षक,मुख्याध्यापक, पद्वीधर शिक्षक,केंद्र प्रमुख व शिक्षण विस्तार अधिकारी बंधू भगिनी उपस्थित होते.सदर मेळाव्यात सेवानिवृत्त शिक्षकांचे प्रा.फंड, गटविमा,पी.पी.ओ.अंशराशिकरण व उपदान,१जुलै काल्पनिक वेतन वाढ, सातवा वेतन आयोग हप्ता रक्कम,केंद्रप्रमुख पदोन्नती वेतन वाढ व रजा रोखीकरण अशा अनेक आर्थिक प्रलंबीत राहीले विषयांबाबत सखोल मार्गदर्शन करून भविष्यात या प्रलंबीत आर्थिक बाबी वेळेवर पुर्तता झाल्या नाही तर प्रशासनाच्या विरोधात सनदशिर मार्गाने संघर्ष करावा लागेल असे मत राज्यप्रतिनिधी श्री.राजाराम सावंत व रत्नागिरी तालुका अध्यक्ष श्री.शंकर वरक यांनी आपल्या मनोगतातुन व्यक्त केले.सेवानिवृत्तांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी जिल्हा व तालुका स्तरावर सर्व पदाधिकारी अतिशय प्रमाणिकपणे काम करत असल्याची माहिती दिली तसेच नविन परिपत्रकानुसार जिल्हा कोषागार मधून सेवानिवृत्ताना ओळख पत्र मिळण्यासठी प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले.त्याचप्रमाणे सेवानिवृत्तांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी आम्ही सदैव कटीबध्द आहोत असे जिल्हाध्यक्ष श्री.खानविलकर यांनी आश्वस्त केले.त्याच प्रमाणे आजपासून आपली संघटना महाराष्ट्र राज्य स्वाभिमानी सेवानिवृत्त शिक्षक व अधिकारी महाराष्ट्र राज्य ह्या संघटनेत समाविष्ट होत आहे.असे राज्यनेते श्री.भरत वडगावकर ह्यानी जाहीर केले.या स्नेह मेळाव्याला श्री.अनिल मोहीते राज्य सरचिटणीस, श्री.धोंडीराम कोष्टी, विभागीय अध्यक्ष,श्री.उमराव रास्ते राज्य संघटक,श्री.गुलाबराव भोसले जिल्हा संघटक सांगली यांनी राज्यस्तरावर संघटनात्मक सुरु असलेल्या कामकाजा बाबत माहिती देताना स्वाभिमानी सेवानिवृत्त शिक्षक व अधिकारी महाराष्ट्र राज्य या संघटनेची निर्मिती संघर्षातून झाली असल्याचे सांगितले आणि या संघटनेच्या विचारधारेत रत्नागिरी जिल्हा शेकडो सभासद घेवून सामिल झाल्याबदल राज्याच्या वतीने स्वागत करण्यात आले यावेळी श्री.यशवंत पाडावे कार्याध्यक्ष रत्नागिरी,श्री.सय्यद जनाब,श्री.विष्णू(दादा)महाडिक जिल्हा सल्लागार,श्री.शंकर रणदिवे ,सौ.स्मिता साळवी यांनी संघटनेच्या कामाबाबत समाधान व्यक्त करून शुभेच्छा दिल्या.या कार्यक्रमाला जिल्हा प्रतिनिधी श्री.सावर्डेकर,श्री.सुनिल चव्हाण,श्री.श्रीधर दळवी,सौ.सावंत,श्री.वेल्हाळ श्री.कुरेशी,श्री.शौकत काझी,पुरोगामी शिक्षक समितीचे जिल्हा नेते श्री. प्रदिप पवार जिल्हा महिला प्रतिनिधी सौ.सुचित्रा सुर्वे,सौ.स्मिता साळूखे, जिल्हा सहसचिव श्री.नितीन शिंदे,तालुका अध्यक्ष श्री.अशोक गावणकर गुहागर,श्री.आर.के. चव्हाण खेड,श्री.दत्तात्रय निबरे लांजा तसेच संघटनेचे जिल्हा व तालुका सर्व पदाधिकारी जिल्ह्यातील सेवानिवृत्त शि.वि.अधिकारी,केंद्रिय प्रमुख,मुख्याध्यापक तसेच शिक्षक वर्ग उपस्थित होते.कार्यक्रमाचे नियोजन व स्नेह भोजनाची व्यवस्था चिपळूण तालुक्याने उत्तम प्रकारे केली होती त्याबद्ल चिपळूण तालुका अध्यक्ष श्री.प्रकाश शिंदे व त्यांच्या सर्व पदाधिकारी यांना धन्यवाद देण्यात आले.स्नेह मेळावा यशस्वी होण्यासाठी श्री.सुभाषराव शिंदे,श्री बळवंत पाटील,श्री.रविंद्र सुतार,श्री.मौला नदाफ,श्री.रमेश तांबिटकर श्री मधुकर मोहीते ह्यानी विशेष मेहनत घेतली.आभार प्रदर्शन श्री.चंद्रकांत जंगम ह्यानी केले.