खेड : खेड तालुक्यातील जलसहाय्यता कार्यक्रमांतर्गत जलदूतांची नियुक्ती तसेच समितीची रचना अधिकृतरित्या जाहीर करण्यात आली आहे. रत्नागिरी पाटबंधारे विभागाच्या कार्यालयातून जारी करण्यात आलेल्या आदेशानुसार जलसहाय्यता कार्यकक्षेसाठी तालुक्यातील दहा सदस्यांची यादी निश्चित करण्यात आली आहे. या यादीत विविध क्षेत्रातील कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते आणि अनुभवी व्यक्तींचा समावेश असून त्यांना पुढील काळात जलव्यवस्थापन, पाणी अडवणे, साठवण, तसेच स्थानिक पाणी समस्यांचे निराकरण या सर्व बाबीसंबंधी जबाबदाऱ्या सोपवण्यात येणार आहेत.
नियुक्त करण्यात आलेल्या सदस्यांमध्ये उत्तमकुमार सुखराज जैन, किरण संजय तायडे, साबिर सिराज कोकणी, ऋषिकेश मोरे, संजय राम आंब्रे, मनोहर गोविंद सकपाळ, संतोष मधुकर ठसाळ, सुशांत पांडूरग, सकपाळ, स्वप्नील विनायक भोसले व अविनाश अरुण सकपाळ या दहा सदस्यांचा समावेश आहे. प्रत्येक सदस्यास त्यांच्या संपर्क क्रमांक आणि ईमेलसह अधिकृत नोंदीत स्थान देण्यात आले आहे. दरम्यान, ४ फेब्रुवारी २०२४ रोजी जलसंपदा विभागाच्या सचिवांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीनंतर जिल्हास्तरावर जलदूत नियुक्ती करण्याचे आदेश देण्यात आले होते. या बैठकीत रत्नागिरी, राजापूर, लांजा, संगमेश्वर, चिपळूण, गुहागर, मंडणगड, खेड आणि शिर्डी या तालुक्यांमधील जलसहाय्यता समित्यांची कामे प्रभावीरीत्या राबवण्यासाठी सक्षम लोकांची निवड करावी असा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार जिल्हाधिकारी रत्नागिरी यांच्या निर्देशानुसार जलदूतांची निवड प्रक्रिया पार पडली असून निवड झालेल्या व्यक्तींना पुढील काळात जलसंकट निवारण, जलसाठा वाढवणे, तसेच प्रशासनाशी समन्वय साधून कार्यवाही करण्याच्या जबाबदाऱ्या सोपवण्यात येणार आहेत. जलसहाय्यता उपक्रमांतर्गत जनजागृती, पाणी वापराचे नियोजन, दुष्काळजन्य परिस्थितीतील उपाययोजना यांसारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर हे सदस्य सक्रिय भूमिका निभावणार आहेत. रत्नागिरी पाटबंधारे विभागाने जारी केलेल्या पत्रात जलसहाय्यता कार्यक्रमाचे गांभीर्य लक्षात घेऊन निवड झालेल्या नावांची माहिती समितीच्या अधिकृत नोंदीत समाविष्ट करण्यात आली आहे. तालुक्यातील पाणीटंचाई आणि जलव्यवस्थापन सुधारण्यासाठी या समितीकडून महत्त्वाची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.











