रक्तदान हेच श्रेष्ठदान

शिक्षक भारती व पु. अ. कर्ले महाविद्यालयाचा संयुक्त उपक्रम

शिरगाव (प्रतिनिधी)

शिक्षक भारतीचे प्रमुख राज्य कार्यवाह श्री. संजय वेतुरेकर सर यांच्या सेवानिवृत्ती निमित्त, रक्तपेढ्यांमध्ये निर्माण होत असलेल्या रक्तसाठ्याच्या तुटवड्याची जाणीव ठेवून सामाजिक बांधिलकी जपत एक प्रेरणादायी रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले. शिक्षक भारती सिंधुदुर्ग आणि पु. अ. कर्ले कला व वाणिज्य महाविद्यालय, शिरगाव यांच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात आला.

 

या कार्यक्रमास महाविद्यालयाचे चेअरमन संभाजी साटम, प्राचार्य प्रा. समीर तारी, राष्ट्रीय सेवा योजनेच्या कार्यक्रमाधिकारी प्रा. कोमल पाटील, शिक्षक भारती देवगड तालुकाध्यक्ष प्रा. हेमंत सावंत, सहसंघटक सागर फाळके, जिल्हा रुग्णालय सिंधुदुर्गचे वैद्यकीय अधिकारी डॉ. स्वप्नील चव्हाण, शिक्षक भारती जिल्हाध्यक्ष प्रशांत आडेलकर, श्री. सुनील जाधव, श्री. भाई कडव, श्री. सत्यपाल लाडगांवकर तसेच सिंधु रक्त मित्र प्रतिष्ठानचे जिल्हा सल्लागार उद्धव गोरे आदी मान्यवरांची उपस्थिती लाभली.

 

कार्यक्रमाचे संयोजन आणि उत्कृष्ट सूत्रसंचालन प्रा. आकाश पारकर यांनी केले, तर आभारप्रदर्शन प्रा. सुगंधा पवार यांनी केले. उपक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा. हेमंत सावंत, प्रा. आकाश पारकर, रुपेश बांदेकर, सुनील जाधव, उदयसिंग रावराणे, बाळू पाटील, महेश जाधव आदींचे मौल्यवान सहकार्य लाभले. तसेच श्री. चंद्रकांत चव्हाण, श्री. समीर परब, श्री. प्रदीप सावंत आणि श्री. शरद देसाई यांनीही महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले.

 

या शिबिरात एक महिला आणि १७ पुरुष उत्साहाने सहभागी झाले.