वेदांत पडवळचे राष्ट्रीय ज्युनिअर गृप तायक्वांदो स्पर्धेत यश!

मसुरे | झुंजार पेडणेकर : मालवण तालुक्यातील ओवळीये गावचा सुपुत्र व मुंबई विक्रोळी (प) सुर्यनगर येथील वेदांत रामचंद्र पडवळ याने कराटे मधील तायक्वांडो क्यूरो्गी (KYOROGI) आणि पूमसे प्रकारांमध्ये अतुलनिय यश संपादन केले. सोमय्या विद्याविहार कॉलेज सायन्स विभाग ११वी मध्ये तो शिक्षण घेत आहे. बेंगलोर येथे १५ व्या राष्ट्रीय ज्युनिअर गृप स्पर्धेत वेदांत पडवळ,राज कांबिरे,दीपेश शिंदे यांनी स्पर्धेत सहभागी होत १३ग्रृप मधील स्पर्धेत सहावा क्रमांक पटकावला. स्टार वन तायक्वांडो अकॅडमी कडून खेळताना मुंबई सबर्बन ३४ वि जिल्ह्यास्तरीय स्पर्धा २०२५ मध्ये तीन गोल्ड मेडल मिळविले. रत्नागिरी डेरवण येथे झालेल्या महाराष्ट्र ३५ व्या राज्यस्तरीय स्पर्धेत क्योरोगी (फाईट) आणि वैयक्तीक पुमसे प्रकारांमध्ये ब्रान्झ आणि ग्रृप पुमसे प्रकारा मध्ये गोल्ड मेडल मिळविले. वेदांत पडवळ याने सन २०१८ ते सन२०२५पर्यत विविध स्पर्धा खेळत ७ गोल्ड,१० सिल्वर आणि १४ ब्रॉन्झ मेडल्स संपादन केले.आतापर्यत तो ५ वेळा राज्यस्तरीय आणि २ वेळा राष्ट्रिय स्पर्धा खेळला असून वेदांत पडवळ याला स्टार वन तायक्वांडो अकॅडमी मुंबई विक्रोळी (प) सुर्यनगर चे प्रशिक्षक श्री कल्पेश गोलांबडे,सौ.सायुरी गोलांबडे, सुहास मोपेकर, वेदांत सावंत यांचे मार्गदर्शन मिळाले. वेदांत हा बांदिवडे स्थित वृत्तपत्र वितरक अजय पडवळ यांचा पुतण्या होत. त्याच्या यशाबद्दल कौतुक होत आहे.