८ हजार १४३ इतके मतदार बजावणार मतदानाचा हक्क
पुरूष ३ हजार ९२४ तर महिला ४ हजार २१९
नगराध्यक्षांसह नगरसेवकांचे भवितव्य महिलांच्या हाती
राजापूर : येथील नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणूकीच्या मतदान प्रक्रियेसाठी प्रशासना सज्ज झाले आहे. लोकनियुक्त नगराध्यक्षपदासह शहरातील दहा प्रभागांतील विस नगरसेवक पदांसाठी ही निवडणूक होत असून यासाठी दहा राजापूरात एकूण ८ हजार १४३ इतके मतदार मतदानाचा हक्क बजावणार असून यामध्ये ४ हजार २१९ महिला मतदार तर ३ हजार ९२४ इतके पुरूष मतदार यांचा समावेश आहे. त्यामुळे संपुर्ण शहरासह प्रभागांतील महिला मतदारांची संख्या हीच शहराचा नगराध्यक्ष व आपल्या प्रभागांतील नगरसेवक ठरविणार आहेत .
या मतदान प्रक्रियेसाठी प्रशासनाकडून सर्व तयारी करण्यात आली असून दहा मतदान केंद्रावर ६० कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. तर शहरात आवश्यक त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून मतदान प्रक्रिया पारदर्शक पध्दतीने पार पाडली जाणार असल्याचे राजापूर तहसीलदार तथा निवडणूक निर्णय अधिकारी विकास गंबरे यांनी सांगितले.
सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत या सर्व केंद्रावर मतदान होणार असून जास्तीत जास्त मतदारांनी मतदानाचा पवित्र हक्क बजावावा असे आवाहनही गंबरे यांनी केले आहे.
राजापूर नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणूकीसाठी मंगळवारी २ डिसेंबर रोजी मतदान तर बुधवारी ३ डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. या निवडणूकीत एकूण ८ हजार १४३ इतके मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यामध्ये ४ हजार २१९ महिला मतदार तर ३ हजार ९२४ इतके पुरूष मतदार यांचा समावेश आहे. यामध्ये सर्वाधिक म्हणजे १ हजार ६० इतके मतदार हे प्रभाग क्रमांक सहा मध्ये असून सर्वात कमी मतदार हे प्रभाग क्रमांक तीन मध्ये ५९६ इतके आहेत.
यामध्ये प्रभाग क्रमांक एक मध्ये एकूण ९०० मतदार असून ४३८ पुरूष तर ४६२ महिला, प्रभाग क्रमांक दोन मध्ये एकूण ७५५ मतदार असून ३६२ पुरूष ३९३ महिला, प्रभाग क्रमांक तीन मध्ये सर्वात कमी म्हणजे एकूण ५९६ मतदार असून यामध्ये २८९ पुरूष तर ३०७ महिला मतदार आहेत. प्रभाग क्रमांक चार मध्ये एकूण ७५६ मतदार असून यामध्ये पुरूष ३६८ तर महिला ३८८, प्रभाग क्रमाक पाच मध्ये एकूण ७५९ मतदार असून यामध्ये ३६७ पुरूष तर महिला ३९२ महिला मतदार आहेत. प्रभाग क्रमांक सहा मध्ये सर्वाधिक १०६० इतके मतदार असून यामध्ये पुरूष ४८६ तर ५७४ महिला मतदारांचा समावेश आहे. प्रभाग क्रमांक सात मध्ये एकूण ९२६ इतके मतदार असून यामध्ये ४४३ पुरूष तर ४८३ महिला मतदारांचा समावेश आहे. प्रभाग क्रमांक आठ मध्ये एकूण ६८३ इतके मतदार असून यात ३४५ पुरूष तर ३३८ महिला मतदार आहेत. प्रभाग क्रमांक नऊ मध्ये एकूण ९२३ मतदार असून यामध्ये ४५२ पुरूष व ४७१ महिला मतदार आहेत. तर प्रभाग क्रमांक दहा मध्ये एकूण ७८५ मतदार असून यामध्ये ३७४ पुरूष व ४११ महिला मतदारांचा समावेश आहे.
मतदान व मतमोजणी प्रक्रियेसाठी पोलीस प्रशासन सज्ज
राजापूर नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणूकीसाठी मंगळवारी २ डिसेंबर रोजी मतदान तर बुधवारी ३ डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. या निवडणूकीसाठी पोलीस प्रशासनही सज्ज असल्याचे राजापूर पोलीस निरीक्षक अमित यादव यांनी सांगितले. जिल्हा पोलीस अधिक्षक नितिन बगाटे व उपविभागिय अधिकारी सुरेश कदम यांच्या मार्गदर्शनाखाली आवश्यक ती बंदोबस्ताची सर्व तयारी करण्यात आल्याचे यादव यांनी सांगितले. एक डीवायएसपी, तीन पोलीस निरीक्षक, आठ इतर अधिकारी, यामध्ये दोन स्ट्रायकिंग फोर्स यामध्ये १० अंमलदार १० होमगार्ड, होमगार्ड ८०, एसआरपीएफ ७५ अंमलदार, मोठी वाहने ५, लहान वाहने ६, टू व्हीलर ५ याशिवाय पोलिस ठाणे मधील ५अधिकारी आणि ३६अंमलदार असा पोलीस बंदोबस्त असणार आहे.













