करजुवे विद्यालयात विज्ञान प्रदर्शन उत्साहात

गौरव पोंक्षे माखजन
विज्ञान हे मानवी जीवनाला मिळालेले वरदान आहे. त्याचा सकारात्मक उपयोग करून विध्यार्थ्यांनी नवनवीन संशोधन करून देशाचे नाव उज्ज्वल करावे असे प्रदीपादन करजुवे पंचक्रोशी शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्राचार्य शशिकांत नलावडे यांनी केले ते करजुवे विद्यालयात विज्ञान प्रदर्शन उदघाट्न कार्यक्रमात बोलत होते. यावेळी माजी पं. स. सभापती सुभाष नलावडे, माजी सरपंच शामसुंदर माने, उपसरपंच श्रीकांत नलावडे,मुख्याध्यापक अशोक कुवळेकर, आदी मान्यवर उपस्थित होते.या वेळी शाळेच्या विद्यार्थिनींनी विज्ञान गीत सादर केले,मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन व प्रतिमानां पुष्पहार अर्पण करण्यात आले. सर्व मान्यवरांचे मुख्याध्यापक अशोक कुवळेकर यांनी पुष्प देऊन स्वागत केले.या वेळी विध्यार्थ्यांनी पाणी बचत, सौरऊर्जा,पवन ऊर्जा, हवेच्या दाबातून ऊर्जा निर्मिती, घराची सुरक्षा यासाठी तंत्रज्ञान,शेती विषयक मार्गदर्शने तसेच गणिती कोडी,आदी प्रयोग मांडले.
या वेळी चाळीस विविध प्रयोगाचे प्रदर्शन मांडण्यात आले होते.या वेळी रामराव बनसोडे,सुभाष नलावडे यांनी मनोगत मांडले
सुनील केसरकर,विठोबा धावडे,सचिदानंद शिर्के, पराग खैर, सूरज माने, संतोष कासारे,श्रीरंग कुंभार, किशोर धामापूरकर, सुमित नलावडे, सुरेश कुंभार, आदी ग्रामस्थ, पालक शिक्षक विध्यार्थी उपस्थित होते
या वेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्रमोद स्वामी यांनी केले.