संजय सुर्वे यांना कोकण राज्य अभियान अंतर्गत कोकण रत्न पुरस्कार जाहीर

चिपळूण  : तालुक्यातील अलोरे गावातील पत्रकार, क्रीडा संघटक,निसर्ग संरक्षण,पर्यावरण रक्षण,आदिवासी विकास, निराधार वृद्धांना मदतकार्यात अग्रणी व्यक्तिमत्व संजय रघुनाथ सुर्वे यांना स्वतंत्र कोकण राज्य अभियान अंतर्गत कोकण रत्न पुरस्कार जाहीर झाला आहे. दि. १३ डिसेंबर रोजी मुंबईत प्रदान करण्यात येणार आहे.
पंचवीस वर्ष ग्रामीण भागात पत्रकार म्हणून काम करतानाच ऑलिम्पिक मान्यताप्राप्त तायक्वांडो, स्क्वॉश रॅकेट, पॅरा ॲथलेटिक्स या क्रीडासंघटनेत दीर्घकाळ पदाधिकारी,सह्याद्री संवर्धन व संशोधन संस्था सल्लागार सदस्य,आठ वर्षापासून सामाजिक स्तरावर चर्चेत असलेली निराधार वृद्ध व्यक्तीचा आधार ठरलेल्या सांजसोबत ‘ या संस्थेचे संचालक,रत्नागिरी जिल्हा गुणवंत कामगार संघटना अध्यक्ष अशा माध्यमातून ते सामाजिक विकासाच्या कार्यात झोकून काम करतात. मुंबईत पत्रकार सचिन कुळझुमकर, स्वतंत्र कोकण अभियान संस्थापक संजय कोकरे,मुंबई अध्यक्ष धनंजय कुवेसकर, खजिनदार राजेंद्र सुर्वे, सुभाष राणे, दिलीप लाड आदी मान्यवरांच्या उपस्थितीत मुंबईत हा कार्यक्रम होणार आहे.