शिरगाव हायस्कूलचे उद्या वार्षिक पारितोषिक वितरण

शिरगाव (प्रतिनिधी)    देवगड तालुक्यातील शिरगाव पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ, मुंबई–संचलित शिरगाव हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचा वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ १२ डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संस्थाध्यक्ष अरुण कर्ले तर प्रमुख पाहुणे म्हणून कवी व गीतकार प्रसाद कुलकर्णी उपस्थित राहणार आहेत.

वार्षिक स्नेहसंमेलनानिमित्त दिवसभर आकर्षक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ८.३० वाजता फनी गेम्स व फूड स्टॉलचे उद्घाटन होणार असून ८.४५ वाजता रांगोळी प्रदर्शन सादर केले जाईल. यानंतर ९.०० वाजता खुली पाककला स्पर्धा, १०.०० वाजता अल्पोपहार, तर १०.३० वाजता अरुणोदय हस्तलिखित प्रकाशन सोहळा, प्रमुख पाहुण्यांचे मार्गदर्शन तसेच वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ होईल. सायंकाळी ६.०० वाजता विद्यार्थ्यांच्या विविध गुणदर्शनपर सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

या भव्य कार्यक्रमांना संस्था पदाधिकारी, संचालक, सभासद, हितचिंतक, विद्यार्थी, पालक व ग्रामस्थांनी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.