चिपळूण (प्रतिनिधी) : महाराष्ट्र मास्टर्स अॅथलेटिक असोसिएशनतर्फे संत ज्ञानेश्वर क्रीडा संकुल, भोसरी पुणे येथे नुकत्याच राज्यस्तरीय अथलेटिक्स, स्विमिंग, पॉवरलिफ्टिंग,वेटलिफ्टिंग, हॉलिबॉल, कबड्डी, बॅडमिंटन, टेबलटेनिस ई. स्पर्धा घेण्यात आल्या. त्यामध्ये चिपळूणच्या सौ निशा आंबेकर यांनी ४५+ वयोगटात गोळाफेक सुवर्णपदक, थाळीफेक सुवर्णपदक, हॅमर थ्रो सुवर्णपदक, १०० मी फ्री स्टाईल सुवर्णपदक, २०० मी फ्री स्टाईल सुवर्णपदक आणि पॉवरलिफ्टिंग मध्ये सुवर्णपदक अशी अनुक्रमे ६ सुवर्णपदके आणि ५० मी. फ्री स्टाईलमध्ये सिल्व्हर मेडल एकूण ७ पदके मिळवून चिपळूणचे नाव उज्वल केले आहे. निशा या स्पर्धेत सर्वाधिक मेडल मिळवणारी खेळाडू ठरली आहे. त्यासाठी असोसिएशनचे अध्यक्ष बाळू चव्हाण यांनी त्यांचे विशेष कौतुक केले आहे. त्यांची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
सौ. निशा गजानन आंबेकर, (पूर्वाश्रमीची वैजयंता कुलकर्णी)व्यवसायाने कर सल्लागार. शिक्षण -Mcom, MBA(Fin), GDC&A. शाळा -कॉलेज जीवनापासून त्यांना खेळाची आवड होती. त्यावेळी ही जिल्हा, राज्य, युनिव्हर्सिटी, इंटर युनिव्हार्सिटी लेवलला ॲथलेटीक्समध्ये मेडल्स मिळवली होती. (१०० मी, २०० मी, ४०० मी धावणे, थाळीफेक, गोळफेक, हॅमर थ्रो,) आणि पॅावर लिफ्टिंग. हे त्यांचे इव्हेंट्स होते, लिफ्टिंग मध्ये इंटरनॅशनलला निवड होऊनही फंडस् अभावी जाता आले नाही. कॉलेजला असतानाच NCC मध्ये “C” सर्टिफिकेट मिळवले, NCC मध्ये पाणबूडीचे प्रशिक्षण हा सर्वात आनंदाचा क्षण, कारण स्कुबा डायव्हींग करणारी भारतातील तिसरी, महाराष्ट्रात दुसरी तर रत्नागिरी जिल्ह्यातील पहिली महिला ठरली आहे.
लग्नानंतर मात्र क्षेत्र बदललं आणि कर सल्लागार आणि प्रमाणित लेखापरीक्षक म्हणून कामाला सुरुवात केली, गेली 18 वर्ष कार्यरत आहे. निशा आंबेकर या अत्यंत धाडसी आणि कोणतेही काम झोकून देऊन यशस्वीपणे पूर्ण करतात. महापुरासारखी परिस्थिती उद्भवल्यास बचाव कार्य अधिक सक्षम करण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षणांतर्गत नगरपालिकेतर्फे वाशिष्ठी नदीत यांत्रिकी बोट चालवण्याचा सराव दिला गेला. त्यातही सौ. निशा आंबेकर यांनी यांत्रिकी बोट यशस्वीपणे चालवून दिलेले अंतर पार केले. सध्या आपत्ती व्यवस्थापन टीमचा भाग असणाऱ्या त्या एकमेव महिला आहेत . आता 22 वर्षानंतर पुन्हा फिटनेससाठी सायकलिंग आणि खेळाची प्रॅक्टिस सुरु केली. गेल्या वर्षी शिर्डी येथे झालेल्या राज्यस्तरीय खेलो मास्टर्स अंतर्गत ४० वर्षापुढील वयोगटात १०० मी. फ्री स्टाईल,५० मी. फ्री स्टाईल, ५० मी. बॅकस्ट्रोक ,५०× ४ रिले फ्रि स्टाईलमध्ये चार सुवर्णपदक, थाळीफेक, गोळाफेक, हॅमर थ्रो यामध्ये तीन रौप्यपदक तर १००×४ रिले रनिंगमध्ये कांस्य पदक अशी एकूण आठ पदके मिळवली. त्यानंतर राष्ट्रीय स्तरावर गोवा येथे ३ गोल्ड ,२ सिल्वर , १ ब्राँझ पदक मिळवले. नोव्हेबर २३ मध्ये स्विमिंग आणि मैदानी मध्ये ३ सुवर्ण, २ रौप्य तर १ ब्राँझ पदक मिळवले आहे . राष्ट्रीय स्तरासाठी निवड. फेब्रुवारी 24 मध्ये 200,300,400, आणि 600 km सायकलिंग करून सायकलिंग क्षेत्रातील मनाचा समजला जाणारा “Super Randonnuer ” हा ‘किताब मिळवला. २०२३ मध्ये पंढरपूर सायकल वारी तसेच गोवा सायकल वरून फन राइड. ५ ऑक्टोबर २०२५ रोजी कोल्हापूर लोहपुरुष स्पर्धे मध्ये रिले प्रकारात २ कि.मी. स्विमिंग १ तास ५ मिनिटात पूर्ण केले. आणि लोहपुरुष रिले ची मानकरी. ९ नोव्हेंबर २०२५ रोजी इंटरनॅशनल लेवल गोवा आयर्न मॅन स्पर्धेत रिले प्रकारात समुद्रात २ कि.मी. स्विमिंग ४८ मिनिटात पोहून आयर्न मॅन (रिले) पदक मिळवले.
आतापर्यंत मिळालेले पुरस्कार-
एकंदरीतच त्यांच्या धाडसाबद्दल दि फ्रेश न्यूज कडून त्यांना “स्वयंसिद्धा” हा कर्तृत्ववान महिला पुरस्कार प्राप्त झाला. सातारा संस्थांनचा “जीवन गौरव” पुरस्कार,तसेच महिला मंडळ वडनाका चिपळूणनेही त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल “कर्तृत्व वान महिला ” म्हणून त्यांचा सन्मान केला. चिपळूण डॉक्टर्स असोसिअशनचा “महिला सन्मान पुरस्कार” तसेच २०२३ साली त्यांना लेखापारीक्षकांच्या राज्य अधिवेशनात कोकण विभागातून दुसरा आणि रत्नागिरी जिल्ह्यातून पहिला असा “सर्वोत्कृस्ट लेखापरिक्षक” असा पुरस्कार मिळवून त्यांनी आपल्या कामात ही काही कमी नाही हे त्यांनी दाखवून दिले आहे.. डिसेंबर २०२२ मध्ये रत्नागिरी कर सल्लागार असोसिएशनचा “Sports Activity” चा सन्मान प्राप्त, मार्च २०२४ ला महिला दिननिमित्त “राज्यस्तरीय कर्तृत्व वान महिला नारिरत्न पुरस्कार २०२४” प्राप्त. १८ डिसेंबर २०२४ मध्ये “इंडियन जर्नलिस्ट असोसिएशन ” चा “भारत विकास रत्न पुरस्कार २०२४” हा राष्ट्रीय पातळीवरील पुरस्कार प्राप्त. २२ एप्रिल २०२५ रोजी कोल्हापूर येथे अभिनेत्री प्रार्थना बेहेरे हिच्या हस्ते “Business Women of the year” हा राज्य स्तरीय पुरस्कार प्राप्त. चिपळूण महिला मंडळ वडनाका तर्फे “कर्तृत्ववान महिला पुरस्कार” प्राप्त. आमदार शेखर निकम यांच्याकडून विशेष सन्मान प्राप्त. याशिवाय त्यांचे सामाजिक कार्य चालू असते, विविध संस्थाना भेटी देणे, देणग्या देणे तसेच गरीब होतकरू मुले शिक्षणासाठी त्यांनी दत्तक घेतली आहेत . शिवाय विविध पाककला स्पर्धांमध्ये तसेच केक स्पधेमध्ये अनेक बक्षिसे मिळवली आहेत. शिवाय क्रीडाभारती, संस्कृतभारती, चिपळूण सायकलिंग क्लब, परिमल मंडळ ई. संस्थांमध्ये विविध पदांवर कार्यरत.. लव्ह जिहाद या विषयावर कार्यरत, व्यसनाधीन लोकं /त्यांची कुटुंब यांच्यासाठी विशेष काम करतात.












