विश्वासार्हता हा स्वामी स्वरुपानंदचा स्थायीभाव याची प्रचिती देणारा ठेव वृद्धीमास सुफल संपन्न तब्बल १८ कोटी ३७ लाखाच्या नव्या ठेवी संकलित – ॲड. दीपक पटवर्धन

रत्नागिरी | प्रतिनिधी : स्वामी स्वरूपानंदच्या ठेववृद्धी मासाला सर्वच शाखांमध्ये भरभरून प्रतिसाद प्राप्त झाला. एकूण १२७७ खात्यात रु.१८ कोटी ३७ लाखाच्या ठेवी संकलित झाल्या. रत्नागिरी शाखा रु.३ कोटी ६७ लाखाच्या ठेवी संकलित करून प्रथम क्रमांकावर तर मारुती मंदिरच्या रु.२ कोटी ९६ लाखांच्या ठेवी संकलित करून दुसऱ्या तर राजापूर ही शाखा रु.१ कोटी ८७ लाख ठेव संकलन करून तिसऱ्या क्रमांकावर राहिली. या ठेव वृद्धी मासात २४३ इतक्या नव्या ठेवीदारांनी ठेव गुंतवली.
संस्थेच्या एकूण ठेवी रु.२७९ कोटी ४२ लाखापर्यंत पोचल्या असून संस्थेने १५ कोटींचे ठेवलेले उद्दिष्ट दोन दिवसापूर्वी पूर्ण होऊन नवा उच्चांक संस्थेच्या ठेवीदारांनी प्रस्थापित केला. भरभरून मिळालेला प्रतिसाद हे संस्थेच्या विश्वासार्हतेचे गमक आहे. आर्थिक शिस्त, नेटके आर्थिक नियोजन, जनसामान्यां पर्यंतचा संपर्क, संस्थेची स्वच्छ प्रतिमा या बळावर स्वरूपानंद पतसंस्थेने सातत्यपूर्ण भरीव कामगिरी केली आहे.
प्राप्त झालेला हा प्रतिसाद संस्थेच्या सुरक्षित आणि भक्कम आर्थिक स्थितीवर जनमानसात प्रचंड विश्वास आहे हे दाखवतो. भरभरून मिळालेल्या प्रतिसादाने मन भावनाप्रधान झाले असून हा प्रतिसाद ऊर्जा देणारा आहे. सर्व ठेवीदार यांना शतशः धन्यवाद देताना संस्थेचे अर्थकारण याच नेमस्त पद्धतीने पुढे जाईल याची ग्वाही ॲड.पटवर्धन यांनी दिली आहे.
संस्थेचे सर्व संचालक, अधिकारी, कर्मचारी, पिग्मी एजंट यांच्या सामूहिक प्रयत्नांचे हे यश आहे असेही ॲड. दीपक पटवर्धन म्हणाले.