खेड नगरपरिषद निवडणूक 2025: भाजप नगरसेवकांची प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याशी भेट

खेड (प्रतिनिधी) – खेड नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 मध्ये भारतीय जनता पार्टीकडून निवून आलेले विद्यमान नगरसेवक व नगरसेविका सौ. वैभवी वहिनी वैभव खेडेकर, श्री. रहीम युसुफ सहीबोले आणि सौ. स्वप्नाली राकेश चव्हाण यांनी आज भाजपचे प्रदेशाध्यक्ष श्री. रवींद्रजी चव्हाण यांची भेट घेतली. यावेळी खेडचे मा. नगराध्यक्ष तसेच भाजप नेते श्री. वैभवजी खेडेकर उपस्थित होते. या भेटीदरम्यान प्रदेशाध्यक्ष श्री. रवींद्रजी चव्हाण यांनी नवनिर्वाचित नगरसेवकांचे अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. खेड नगरपरिषदेच्या कामकाजाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. शहराच्या विकासासाठी समन्वयाने काम करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.
नागरिकांच्या मूलभूत सुविधा, स्वच्छता, पाणीपुरवठा, रस्ते तसेच विविध विकासकामे गतीने पूर्ण करण्यावर भर देण्यात यावा. भाजपच्या माध्यमातून खेड शहराचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी कटिबद्ध असल्याचे यावेळी नगरसेवकांनी सांगितले. या भेटीमुळे खेड नगरपरिषदेत भाजपच्या विकासात्मक कामांना नवी दिशा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.