रत्नागिरी–येथील बसणि पंचक्रोशी ग्रंथालयातर्फे १९९१ पासून एकपात्री अभिनय स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. गेली तीन वर्षे ही स्पर्धा कै. श्रीधर कृष्णा पेटकर यांच्या स्मरणार्थ आयोजित करण्यात येते.
रत्नागिरी तालुक्यातील पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना या स्पर्धेत सहभागी होता येईल. स्पर्धक विद्यार्थ्यांना कोणत्याही नाटकातील एकांकिकेतील अथवा स्वलिखित उताऱ्यातील भाग सादर करता येईल. सादरीकरणासाठी कमीत कमी पाच आणि जास्तीत जास्त सात मिनिटे वेळ देण्यात येईल. स्पर्धा रविवार दिनांक ११/१/२०२६ रोजी सकाळी दहा वाजता बसणि पंचक्रोशी ग्रंथालयाच्या सभागृहामध्ये सुरू होईल. स्पर्धेसाठी प्रवेश फी रुपये तीस ठेवण्यात आली असून ती स्पर्धेच्या दिवशी द्यावयाची आहे.
स्पर्धेसाठी पुढील प्रमाणे पारितोषिके ठेवण्यात आलेली आहेत. प्रथम_१५००. द्वितीय_१३००. तृतीय_११००. उत्तेजनार्थ_१)५००. २)५००. तसेच सर्व विजेत्यांना स्मृतीचिन्ह देण्यात येईल आणि सहभागी होणाऱ्या स्पर्धकांना सहभागाचे प्रमाणपत्र देण्यात येईल. परीक्षकांचा निर्णय अंतिम व बंधनकारक राहील.
अधिक माहितीसाठी श्रीनिवास जोशी मुक्काम पोस्ट बसणि ता. रत्नागिरी७६६६४२३१८३ आणि श्रीकांत पाटील मुक्काम पोस्ट कुवारबाव९४२३०४९७०५ येथे संपर्क साधावा असे ग्रंथालया मार्फत आवाहन करण्यात आलेले आहे.












