रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात खेड तालुक्यात एक व राजापूर तालुक्यात एक आणि संगमेश्वर तालुक्यात एक असे तीन मध्यम पाटबंधारे प्रकल्प असून तिन्हींमधील एकूण प्रकल्पीय उपयुक्त पाणीसाठा क्षमता 182.69 दशलक्षघनमीटर इतकी आहे.
जिल्ह्यातील मध्यम पाटबंधारे प्रकल्पांचा पुढीलप्रमाणे उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे. सर्व आकडे द.ल.घ.मी परिमाणात आहेत. कंसातील आकडे प्रकल्पातील पाण्याच्या टक्केवारीचे आहेत.
मध्यम पाटबंधारे प्रकल्प नातुवाडी – 18.377 (67.49), मध्यम पाटबंधारे प्रकल्प गडनदी – 66.387 (80.08), मध्यम पाटबंधारे प्रकल्प अर्जुना – 72.560( 100) या प्रमाणे उपलब्ध पाणीसाठा आहे.










