तळवली पंचायत समिती गणातून मनसेचे उपजिल्हाध्यक्ष विनोद जानवळकर इच्छुक…..

गुहागर प्रतिनिधी
गुहागर तालुक्यातील तळवली पंचायत समिती गणातून जानवळे गावचे रहिवासी व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपजिल्हाध्यक्ष विनोद जानवळकर इच्छुक असल्याची चर्चा सर्वत्र होत आहे. त्यासाठी त्यांनी तळवली पंचायत समिती गणातील कार्यकर्ते व मतदारांशी संपर्क ठेवण्यास सुरुवात केली आहे. मनसेचे उपजिल्हाध्यक्ष विनोद जानवळकर हे लढवय्या व डॅशिंग कार्यकर्ते म्हणून परिचित आहेत. मनसेचे अध्यक्ष राज साहेब ठाकरे यांच्या विचारांना प्रेरित होऊन त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये प्रवेश केला होता त्यानंतर मनसे सैनिक ते उप तालुका अध्यक्ष, तालुकाध्यक्ष त्यानंतर उपजिल्हाध्यक्ष म्हणून पक्षांमध्ये मोठी भरारी घेतली होती. त्यांचे सर्वच पक्षातील कार्यकर्त्यांशी सलोख्याचे व जिव्हाळ्याचे संबंध आहेत. सत्यासाठी संघर्ष करणे तसेच कार्यकर्त्यांना न्याय देणे हे त्यांच्या विशेष काम मनसेच्या माध्यमातून दिसून येते. मनसे पक्षाच्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रम त्यांनी राबवले आहेत. कोरोना काळामध्ये सुद्धा गरीब व गरजू तसेच निराधार लोकांना त्यांनी मदतीचा हात पुढे केला होता. याचे आजही स्मरण सर्वांना होत आहे.तळवली पंचायत समिती गणातून नक्कीच प्रचंड मताधिक्याने निवडून येतील असा विश्वास गणातील सर्व कार्यकर्त्यांकडून व्यक्त होत आहे. तळवली पंचायत समिती गणाचे आरक्षण सर्वसाधारण असून याच गणातून उमेदवारी मिळाल्यास आपण निवडून येऊ असा विश्वासही त्यांनी बोलताना व्यक्त केला आहे.