लांजा (प्रतिनिधी) भाजपाच्या नवनिर्वाचित नगरसेविका प्रणाली गुरुप्रसाद तेली यांचा नुकताच भाजपा पदाधिकाऱ्यांच्या वतीने सत्कार करण्यात आला.
नुकत्याच झालेल्या लांजा नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये प्रणाली गुरुप्रसाद तेली या महायुतीतून भाजपाच्या एकमेव उमेदवार निवडून आल्या होत्या. याबद्दल त्यांचा भाजपाच्या पक्ष कार्यालयात नुकताच सत्कार करण्यात आला. याप्रसंगी भाजपाचे पदाधिकारी मयूर शेडे, इकबाल गिरकर, मनोज उर्फ बाबा चांदोरकर, ॲड सुमंत वाघदरे, प्रभाकर कोळवणकर, भरत कोळवणकर, वर्षा प्रभुदेसाई ,गुरुप्रसाद तेली आदी उपस्थित होते.
यावेळी भाजपा पदाधिकाऱ्यांनी प्रणाली तेली यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.









