वेंगुर्ले आगारातील श्री साई मंदिर देवस्थानचा उद्या पासून वर्धापन दिन उत्सव 

वेंगुर्ले l दाजी नाईक :वेंगुर्ला आगार येथील रा. प. वेंगुर्ला स्थानकावरील श्री साई मंदिर देवस्थानचा २९ वा वर्धापन उत्सव सोमवार १९ व मंगळवार २० जानेवारी २०२६ रोजी भक्तिमय वातावरणात संपन्न होणार आहे.

माघ शुद्ध प्रतिपदा शके १९४७, सोमवार दि. १९ जानेवारी रोजी सकाळी ८ वा. श्री गणेश पूजन व धार्मिक विधी, ९ वा. शहरातून साईंची भव्य पालखी मिरवणूक, दुपारी ३ वा. हळदीकुंकू, सायं.४ वा. स्थानिकांची भजने, सायं.५ वा. ब्राह्मण भजन मंडळ, तेर्सेबांबर्डे यांचे भजन, सायं. ७ वा. महाआरती, सायं. ७.३० वा. पालखी मिरवणूक, रात्रौ ८.३० वा. पार्सेकर द.ना. मंडळाचा ‘कर्म प्रारब्ध’ हा दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे.

तसेच माघ शुद्ध द्वितीया मंगळवार २० जानेवारी रोजी महारुद्र व जप सांगता, साईबाबांची महापूजा, ११ वा. महाआरती व महानैवेद्य, दु.१२ ते सायं. ४ पर्यंत महाप्रसाद, सायं. ५ वा. भजने, सायं. ७ वा. महाआरती, सायं. ७.३० वा. पालखी मिरवणूक, रात्रौ ९ वा. धनुप्रिया प्रॉडक्शन निर्मित ‘एकापेक्षा एक’ हे धमाल कौटुंबिक फार्सिकल दोन अंकी मालवणी नाटक सादर होणार आहे.

उत्सवकाळात विविध धार्मिक कार्यक्रम, पूजाविधी व भक्तिमय उपक्रमांचे आयोजन करण्यात आले असून साईभक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन श्री साई मंदिर देवस्थान समिती व कर्मचारीवृंद, रा. प. वेंगुर्ला आगार यांनी केले आहे.