भाट्ये येथे दुचाकी घसरून चालक जखमी; जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू

रत्नागिरी : प्रतिनिधी
शहरानजीकच्या भाट्ये येथील रस्त्यावर दुचाकी स्लिप झाल्याने स्वार जखमी झाला. उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
ऐजाज अल्ताफ बावानी (२५, रा. गवळीवाडा, रत्नागिरी) असे जखमी दुचाकी चालकाचे नाव आहे. ही घटना रविवार 25 जानेवारी रोजी सकाळी 7.30 वा. सुमारास भाट्ये रस्त्यावर घडली. ऐजाज बावानी हा आपल्या ताब्यातील दुचाकी ( एमएच-०८ एसी ६) घेऊन पावसहून रत्नागिरीकडे येत होते. भाट्ये येथील रस्त्यावर त्याची दुचाकी स्लिप झाली. या अपघातात तो जखमी झाला. उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघात प्रकरणी जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या पोलिस चौकीत नोंद करण्यात आली आहे.