राजापूर प्रतिनिधी : शहरात राबविण्यात येत असलेल्या विशेष स्वच्छता मोहिमेतंर्गत गुरूवारी राजापूर शहरात दिवटेवाडी येथील गोठण मैदान परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले.यावेळी या भागातील स्वच्छता करण्यात आली.
नगराध्यक्षा ॲड, हुस्नबानू खलीफे यांच्या सूचनेनुसार, तसेच मुख्याधिकारी अभिजित कुंभार व कार्यालयीन अधीक्षक जितेंद्र जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली राजापूर नगर परिषदेमार्फत दिनांक ११ फेब्रुवारी २०२६ पासून शहरात विशेष स्वच्छता मोहीम सुरू करण्यात आली आहे. या मोहिमेअंतर्गत गुरूवारी शहरातील दिवटेवाडी येथील गोठण मैदान परिसरात स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. या अभियानादरम्यान परिसरातील कचरा साफसफाई, गटार स्वच्छता तसेच झुडपे व अनावश्यक वाढलेली वनस्पती हटविण्याचे काम करण्यात आले. नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने स्वच्छ व सुरक्षित वातावरण निर्माण करण्याचा उद्देश यामागे असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
या वेळी नवनिर्वाचीत नगरसेविका जान्हवी गिरीश वादक, स्वच्छता व पाणी पुरवठा अभियंता सुप्रिया पोतदार, स्वच्छता निरीक्षक अमित पोवार, मुकादम राजन जाधव, सुशील यादव, संदेश जाधव तसेच पोलीस निरीक्षक अमित यादव व सफाई कर्मचारी व नागरिक उपस्थित होते.
नगर परिषदेकडून शहरातील विविध भागांमध्ये ही विशेष स्वच्छता मोहीम पुढील काही दिवस सुरू राहणार असून नागरिकांनीही स्वच्छता राखण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
Home महत्वाच्या बातम्या राजापुरात विशेष स्वच्छता मोहिमेतंर्गत दिवटेवाडी येथील गोठण मैदान परिसरात स्वच्छता













