खुडी शाळेत ‘गावठी बाजारास’ उत्स्फूर्त प्रतिसाद !

मसुरे | झुंजार पेडणेकर :‘ भाजी घ्या भाजी, ताजी ताजी भाजी, कणगी,चिनी,शेवग्याच्या शेंगा, चवळी पाला, भुईमूगाच्या शेंगा,सुरण,वाली, फणसाच्या कुवऱ्या,लाल भाजी, मोहरीची भाजी 20 रुपयाला 2 जुड्या,,४०ला ४ जुड्या …. अशा असंख्य आरोळ्यांनी शनिवारच्या सकाळी खुडी शाळेचे प्रांगण दुमदुमून गेले होते. निमित्त होतं गावठी बाजाराचे. त्यानिमित्ताने शेतातील,घरगुती उत्पादनांचे प्रदर्शन व विक्री झाली.दरवर्षी प्रमाणे याही वर्षी खुडी गावातील खुडी नं १ या शाळेच्या वतीने ‘गावठी बाजाराचे’आयोजन करण्यात आले होते.

‌ मुलांनी शेतातील विविध पालेभाज्या, फळे, घरगुती उत्पादने,धान्य,खाद्यपदार्थ इ.विकण्यासाठी दुकाने मांडली होती. खुडी पंचक्रोशीतील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून भाज्यांची, उत्पादनांची मुलांकडून खरेदी केली. आपली भाजी, वस्तू, खाद्यपदार्थ विकण्यासाठी मुलांची चाललेली धडपड पाहण्यासारखी होती. यातून मुलांना व्यवहारातील विविध संकल्पनांची ओळख होण्यास मदत झाली तसेच शेतातून उपलब्ध होणाऱ्या पालेभाज्या , ऋतुमानानुसार उपलब्ध होणारी फळे, घरगुती पदार्थांचे पौष्टिक मूल्य व महत्त्व,कमीत कमी खर्चात उपलब्धता यांची विद्यार्थ्यांना माहिती मिळाली.

‌सदर उपक्रमाला

सरपंच श्री. दिपक कदम, उपसरपंच श्री. शशिकांत कावले,

पोलिस पाटील सौ. मृण्मयी आरेकर, खुडीपाट शाळेचे मुख्याध्यापक श्री. राम कवर, खुडी पन्हळी शाळेचे मुख्याध्यापक श्री.लक्ष्मण जगदाळे, शा.व्य.स.

अध्यक्ष श्री.सुमित

जोईल, शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्षा सौ.प्रेरणा घाडी, अंगणवाडी सेविका सौ.आर्या धुरी,

अंगणवाडी सेविका साक्षी गुळेकर, सौ निकिता पाडावे, वरेरी डाटा एन्ट्री ऑपरेटर श्री.अर्जुन धुरी,नारींग्रे गावचे श्री. अनिल मांजरेकर, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य,खुडी ग्रा.पं. सदस्य,

पालक वर्ग, माजी विद्यार्थी,खुडी ग्रामस्थ, उपस्थित होते.

कुणकेश्वर जिल्हा परिषद सदस्य सुनील पारकर,मुणगे पं.समिती सदस्य सदाशिव ओगले, केंद्रप्रमुख श्री.रमेश राठोड, ग्राम अधिकारी श्री .शेटगे यांनी उपक्रमासाठी शुभेच्छा दिल्या.

खुडी ग्रामस्थ व शाळेचे माजी विद्यार्थी यांनी बाजारास भेट देऊन शुभेच्छा दिल्या व खरेदी केली. उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी खुडी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.विनीता दुखंडे,

पदवीधर शिक्षिका सौ.स्मिता कदम,

पदवीधर शिक्षक श्री.योगेश पाटील, श्री.विजय माने

या सर्वांनी उत्कृष्ट नियोजन केले.शाळा व्यवस्थापन समिती खुडी अध्यक्ष, उपाध्यक्ष व सदस्य यांचे मोलाचे सहकार्य लाभले.