राज्यात ११ अतिरिक्त जिल्हाधिकारी व ६९ अतिरिक्त तहसील कार्यालये नव्याने होणार सुरू

दापोलीत लवकरच अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांच होणार ऑफिस

दापोली | प्रतिनिधी : वाढती लोकसंख्या आणि महसूल विभागावर वाढणारा ताण लक्षात घेऊन राज्य मंत्रिमंडळाने ११ अतिरिक्त जिल्हाधिकारी व ६९ अतिरिक्त तहसील कार्यालये नव्याने सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. याचा पाठवपुरावा गृहराज्यमंत्री नामदार योगेश कदम आणि दापोलीतील सर्व वकिलांनी केला होता. या निर्णयानुसार रत्नागिरी जिल्ह्यात दापोली येथे अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालय, तर राजापूर तालुक्यात रायपाटण येथे अतिरिक्त तहसील कार्यालय स्थापन होणार आहे. नवीन कार्यालयांमुळे प्रशासन अधिक गतिमान होऊन नागरिकांना महसूलविषयक सेवा सुलभ व वेळेत मिळणार असल्याची अपेक्षा आहे.