माखजन मराठी शाळेला स्मार्ट टीव्ही भेट

गौरव पोंक्षे | माखजन :
संगमेश्वर तालुक्यातील माखजन येथील जिल्हा परिषदेच्या आदर्श शाळा माखजन मराठी शाळेला स्मार्ट टीव्ही भेट मिळाला आहे.
विशेष बाब म्हणजे शाळेतील गरज लक्षात घेता,शाळेतीलच शिक्षकांनी शाळेला स्मार्ट टीव्ही भेट दिला.मुख्याध्यापक सौ. नांदिवडेकर,श्री रविंद्र घाणेकर, श्री. मितेश पळे, सौ . सुप्रिया जाधव या शिक्षकांनी अमूल्य देणगी दिली.
शिक्षकांनी शाळा व्यवस्थापन अध्यक्षा सौ शामल सागवेकर,उपाध्यक्ष बाबू धामणाक यांचे कडे भेट सुपूर्त करण्यात आले.ह्या अभिनव उपक्रमाबद्दल शिक्षकांचे अभिनंदन होत आहे .