सावरवाड येथील आरोग्य शिबिराचा ४०० रुग्णांना लाभ!

▪️ध्यास फाऊंडेशनकडून आयोजन

मसुरे | झुंजार पेडणेकर :अखिल भारतीय आयुर्वेदिक संस्थान, गोवा धारगळ व
ध्यास फाऊंडेशनच्या वतीने आयोजित आरोग्य शिबीराचा 400 रुग्णांनी लाभ घेतला.
सर्वांना आवश्यक ती औषधे देण्यात आली.
या शिबिरात डॉ. सुमित गोयल, बालरोग तज्ञ
डॉ. राजेश उदूके, जनरल फिजीशियन
डॉ. विनू केशवण, कान, नाक, घसा
डॉ. विक्रांत पाटील,
डॉ. पूजा गावडे, डॉ. शमा मुकादम
डॉ. निलेश कुकरे
डॉ. चेतन कुमरे
या डॉक्टरांच्या टिमने रुग्णांची तपासणी करून योग्य तो सल्ला दिला.
कुणाजी पाताडे, मयुरी वराडकर, तेजस राणे, समिर पावणे, गिरीश नाईक, रमाकांत माईप या सर्वांनी सहकार्य केले.
अधिक उपचारासाठी धारगळ येथे पूर्णपणे मोफत उपचार होणार असल्याचे सांगितले.
यावेळी ध्यास फाऊंडेशनचे अध्यक्ष सुरेश दत्ताराम चव्हाण, सर्व सदस्य नंदन केसरकर, युवराज ढोलम, धोंडू फाटक, ज्ञानेश्वर चव्हाण, रुपेश भोगटे, धनाजी वराडकर, समीर मुंबरकर , किर्तीराज चव्हाण, संतोष लुडबे, प्रकाश धोगळे,
आकाश ढोलम, कल्पेश ढोलम,किशोर साळगावकर या सर्वांनी
नेटके नियोजन करून
हे शिबीर यशस्वी केले.