सभापतीपदी मानसी आंबेकर तर उपसभापतीपदी आदेश आंबोळकर विराजमान
लांजा (प्रतिनिधी) लांजा तालुका पंचायत समितीच्या सभापती उपसभापती पदाची निवडणूक आज सोमवारी बिनविरोध पार पडली. अपेक्षेप्रमाणे सभापतीपदी मानसी आंबेकर तर उपसभापतीपदी आदेश आंबोळकर यांची निवड होऊन त्यांना खुर्चीत विराजमान करण्यात आले.
नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीमध्ये आमदार किरण सामंत यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने एकतर्फी विजय संपादन केला होता. पंचायत समितीच्या आठ पैकी आठही जागांवर शिवसेनेने वर्चस्व प्रस्थापित केले होते. त्यामुळे सभापती, उपसभापती पदी शिवसेनेच्याच उमेदवारांची वर्णी लागणार हे निश्चित होते. सभापतीपदी मानसी आंबेकर आणि उपसभापतीपदी आदेश आंबोळकर यांची नावे निश्चित करून ती रविवारी जाहीर करण्यात आली होती.. त्यामुळे सभापती उपसभापती पद निवडीची प्रक्रिया आज पार पडली.
दुपारी चार तीन वाजता ही निवड झाली यामध्ये सभापतीपदी देवधे गणातून निवडून आलेल्या मानसी आंबेकर यांची तर उपसभापतीपदी साटवली गणातून निवडून आलेल्या आदेश आंबोळकर यांची निवड करण्यात आली. त्यानंतर शिवसेनेच्या पदाधिकारी असलेल्या आणि रत्नागिरी नगर परिषदेच्या नगराध्यक्ष शिल्पा सुर्वे यांनी या दोन्ही पदाधिकाऱ्यांना त्यांच्या खुर्चीत विराजमान केले. यानंतर उपस्थित सर्व शिवसेना पदाधिकारी यामध्ये तालुकाप्रमुख गुरुप्रसाद देसाई, विधानसभा क्षेत्र प्रमुख सुनील कुरूप, लांजा नागरा ध्यक्ष्य सावली कुरूप यांचेसह सर्वच शिवसेना पदाधिकारी तसेच अधिकारी वर्गाकडून दोन्ही पदाधिकाऱ्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांना त्यांचे अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.












