लांजा नगरपंचायत येथे पार पडली रांगोळी आणि पाककला स्पर्धा

जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून नगरपंचायतीचा उपक्रम

लांजा (प्रतिनिधी) जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून लांजा नगरपंचायतीच्या वतीने रांगोळी आणि पाककला स्पर्धा पार पडल्या.

लांजा नगरपंचायतीच्या वतीने दरवर्षी जागतिक महिला दिनाचे निमित्ताने विविध उपक्रम हाती घेण्यात येतात. याच अनुषंगाने महिला दिनाचे औचित्य साधून लांजा नगरपंचायतीच्या सभागृहात महिला वर्गासाठी रांगोळी आणि पाककला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.‌ या स्पर्धांना शहरातील महिला वर्गांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद लाभला. झालेल्या स्पर्धेमध्ये रांगोळी स्पर्धेत स्पर्धकांनी विविध अशा प्रकारच्या उत्कृष्ट अशा रांगोळ्या सादर केल्या होत्या. त्याचप्रमाणे पाककला स्पर्धेत देखील महिलांनी उत्तम उत्तम असे विविध पदार्थ सादर केले होते.

या स्पर्धे प्रसंगी लांजा नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष सौ.सावली सुनील गुरुप, नगरपंचायतीचे मुख्याधिकारी अभिजीत कुंभार, नगरपंचायतीच्या सहाय्यक प्रकल्प अधिकारी रीना गुजर, यांच्यासह नगरसेविका, अधिकारी वर्ग, कर्मचारी आणि स्पर्धक उपस्थित होते.

दरम्यान उद्या बुधवारी 11 मार्च रोजी सकाळी 11 वाजता शहरातील अजिंक्य मंगल कार्यालय या ठिकाणी नगरपंचायतीच्या वतीने महिला दिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून यावेळी देखील महिलांसाठी विविधांगी असे स्पर्धात्मक कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले आहेत.