दाजीपुर अभयारण्य ७ एप्रिल पर्यंत बंद…

प्रतिनिधी/ रोहन कांबळे

कोल्हापूर: राधानगरी तालुक्यातील प्रसिद्ध दाजीपूर ( वन्यजीव अभयारण्य सध्या २५ मार्च २०२६ ते ७ एप्रिल २०२६ या कालावधीत पर्यटनासाठी पूर्णतः बंद राहणार आहे.यापूर्वी नववर्षाच्या पार्श्वभूमीवर ३०-३१ डिसेंबरलाही अभयारण्य बंद ठेवण्यात आले होते.

दाजीपूर अभयारण्य हे गव्यासाठी प्रसिद्ध आहे.
सफारी रस्त्याची दुरुस्ती व देखभाल कामे सुरळीतपणे पार पाडण्यासाठी तसेच पर्यटकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे. या काळात कोणत्याही प्रकारची पर्यटन सफारी सेवा उपलब्ध राहणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. तरी सर्व पर्यटकांनी याची नोंद घेऊन सहकार्य करावे, असे आवाहन वनक्षेत्रपाल राजेंद्र घुनकीकर यांनी केले आहे.