सिंधुदुर्ग | प्रतिनिधी:कणकवली येथील SSPM कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांनी रत्नागिरी येथे आयोजित रोबोट निर्मिती कार्यशाळा आणि ‘Stabilia 2K26’ या राज्यस्तरीय स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करत तृतीय क्रमांक पटकावला आहे.
रत्नागिरी येथे पार पडलेल्या विशेष कार्यशाळेत विद्यार्थ्यांनी ‘स्वयंसंतुलित’ (Self-Balancing) रोबोटच्या रचना व निर्मितीचे प्रत्यक्ष प्रशिक्षण घेतले. या प्रशिक्षणादरम्यान त्यांनी आर्डुइनो प्रोग्रामिंग, कंट्रोल सिस्टिम्स, रोबोटिक्सची मूलभूत तत्त्वे तसेच डिझाईन व हार्डवेअर असेंब्ली या विषयांचे सखोल ज्ञान आत्मसात केले. या कौशल्याचा उपयोग त्यांनी स्पर्धेत प्रभावीपणे केला.
फिनोलेक्स अकॅडमी ऑफ मॅनेजमेंट अँड टेक्नॉलॉजी (FAMT), रत्नागिरी येथे ‘ब्रेनवेव्ह्ज’ अंतर्गत दि. २० व २१ फेब्रुवारी २०२६ रोजी ‘Stabilia 2K26’ ही स्पर्धा पार पडली. “Where Balance Becomes Power” या संकल्पनेवर आधारित या स्पर्धेत राज्यभरातील १२ संघांनी सहभाग घेतला होता.
SSPM कॉलेजच्या संघात चिन्मय नारकर, पार्थ कांगुटकर, प्रतीक पिळणकर आणि यशोधन कदम या विद्यार्थ्यांचा समावेश होता. संघाने तिन्ही फेऱ्यांमध्ये उत्कृष्ट कामगिरी नोंदवली. स्थिरता चाचणी (Stability Test) मध्ये द्वितीय क्रमांक, मार्ग अनुसरण (Path Following) फेरीत तृतीय क्रमांक, तर अडथळा शर्यत (Obstacle Course) या कठीण फेरीत सर्वात कमी वेळ नोंदवत प्रथम क्रमांक मिळवला.
एकूण गुणांच्या आधारे SSPM कॉलेजच्या संघाने राज्यस्तरावर तृतीय क्रमांक पटकावला. विजेत्या संघाला ₹५,००० रोख रक्कम, प्रमाणपत्रे आणि पदके देऊन सन्मानित करण्यात आले.
विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.डी.एस.बाडकर, संस्थापक मा. नारायणराव राणे साहेब, संस्थेच्या अध्यक्ष मा. सौ. नीलमताई राणे मॅडम, उपाध्यक्ष सन्मानीय नीतेशजी राणे साहेब आणि सचिव सन्मानीय निलेशजी राणे साहेब यांनी विशेष कौतुक केले.
या यशामुळे विद्यार्थ्यांचे सर्वत्र कौतुक होत असून भविष्यात रोबोटिक्स व ऑटोमेशन क्षेत्रात मोठी झेप घेण्याचा त्यांचा निर्धार आहे.













