▪️सहकारातून समृद्धीकडे:मसुरे येथे शेतकरी मेळावा उत्साहात संपन्न
मसुरे | झुंजार पेडणेकर :तरुणांनी शेतीत येणे आवश्यक आहे. आत्म संतुष्ट राहू नका. आळस झटका म्हणजे प्रगती होईल. या भागात दुग्ध संकलन वाढणे आवश्यक आहे. काम करताना लाज बाळगू नका. पुढील काळात अती कष्ट करणारी आणि अती हुशार माणसे पुढे जाणार आहेत असे प्रतिपादन कुडाळ येथील भगीरथ प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ प्रसाद देवधर यानी येथे केले. मसुरे येथील श्री पावणाई देवी महिला दूध उत्पादक संस्था मसूरे बांदिवडे यांच्या वतीने आयोजित शेतकरी मेळावा कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते. यावेळीसंस्था अध्यक्ष सौ अल्का विश्वास साठे, जी प सदस्या सौ क्षमा हडकर, माजी प स सदस्यां सौ गायत्री ठाकूर, सौ. पूजा ठाकूर, मयुरी पेडणेकर, संस्था मार्गदर्शक डॉ विश्वास साठे, पांडुरंग ठाकूर, तन्वी हिंदळेकर, मयुरी पेडणेकर आदी व्यासपीठावर उपस्थित होते. उपसा सिंचन योजना जिल्हात होणे आवश्यक आहे. कुक्कुटपालन, बकरी पालन आणि शास्त्रोक्त पद्धतीने दुग्ध पालन करणे आवश्यक आहे. युवकांनी क्रिकेटमध्ये वेळ न घालवता शेतीवर आधारित उद्योगात वेळ खर्च करावा.एकमेकांना सहकार्य करून सहकार रुजवा असे आवाहन डॉ प्रसाद देवधर यानी केले. यावेळी डॉ विश्वास साठे यानी हरियाणा येथील म्हैस खरेदी मधून गोकुळ कडून पाच लाख पंच्याहतर हजार रुपये अनुदान आणि वासरू संगोपन योजनेमधून 72 हजार रुपये अनुदान शेतकऱ्यांना मिळाल्याचे प्रस्ताविकात सांगितले. येथील दूध संकलन वाढवण्यासाठी चांगल्या गुरांची जोपासना करण्याचे आवाहन त्यांनी केले. यावेळी पोलीस पाटील सौ. प्राजक्ता पेडणेकर, शशांक ठाकूर, विष्णू पेडणेकर यांचा सत्कार करण्यात आला. मालवण तालुका पत्रकार समितीच्या अध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल पत्रकार दत्तप्रसाद पेडणेकर, पतपेढी शाखाधिकारी पंढरीनाथ पाटील, तसेच जि. प. आणि प.स. सदस्य यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हा बँक शाखाधिकारी संतोष गावकर, पतपेढी शाखाधिकारी पंढरीनाथ पाटील, बांदिवडे माजी उपसरपंच सतीश बांदिवडेकर, माजी सरपंच संदीप हडकर, अभि घाडीगावकर, महेंद्र हिर्लेकर, सिद्धेश मसुरकर, महम्मद खान, समीर सावंत, तुळशीदास चव्हाण, हेमंत बागवे तसेच शेतकरी, ग्रामस्थ, महिला बहुसंख्येने उपस्थित होत्या. आभार बाबू आंगणे यांनी मानले.













