ग्रामीण भागात धावत आहेत स्क्रॅब मधील मोटरसायकल

परप्रांतीय युपी- बिहार मधील भैय्यांकडून सर्रासपणे वापर, कारवाई कधी? लोकांचा सवाल

लांजा (प्रतिनिधी): तालुक्याच्या विविध ग्रामीण भागामध्ये काजू बी खरेदी करणाऱ्या परप्रांतीय भैय्यांकडून सध्या सर्रासपणे काजू बी वाहतूक करण्यासाठी स्क्रॅप मधील टू व्हीलर गाड्यांचा वापर केला जात असून त्यांच्यावर कारवाई कधी होणार? असा सवाल ग्रामस्थांतून केला जात आहे.
दरवर्षी काजू हंगाम सुरू झाला की हे परप्रांतीय युपी -बिहार मधून आलेले भैय्यांकडून तालुक्याच्या ग्रामीण भागामध्ये जाऊन टोस्ट बटर च्या बदल्यात काजू बी ची खरेदी केली जाते. या काजूबीच्या वाहतुकीसाठी सर्रासपणे स्क्रब मध्ये गेलेल्या मोटार सायकल, दुचाकींचा सर्रासपणे वापर केला जातो. अगदी भंगार मध्ये गेलेल्या बजाज एम ए टी, व अनेक दुचाकी वापरल्या जातात. अनेकांचे तर नंबर प्लेट नसतात. अगदी दरवर्षी हे चित्र सर्रासपणे दिसून येते.
एकीकडे आरटीओ कार्यालयाकडून स्क्रॅप मध्ये गेलेल्या आणि एच एसआरपी नंबर नसलेल्या गाड्यांवर कारवाई केली जाते. मात्र ग्रामीण भागात सर्रासपणे अशा एच एस आर पी नंबर नसलेल्या आणि स्क्रॅब मध्ये गेलेल्या गाड्यांचा वापर केला जात आहे. त्यांच्याकडे कानाडोळा का केला जातो? एरवी स्थानिक व्यक्तीकडे एच एस आर पी नंबर नसलेल्या दुचाकी व चार चाकी गाड्या आढळल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जाते. मग परप्रांतीयांकडून तालुक्याच्या ग्रामीण भागात सर्रासपणे वापर होत असलेल्या दुचाकी आणि या गाड्या वापरणाऱ्यांवर कारवाई कधी होणार? की कारवाई फक्त स्थानिकांसाठी असा संतप्त सवालचा व्यक्त होत आहे.