माखजन हायस्कुल मध्ये पोषण आहारात, मिसळ पाव

विदयार्थी खूष तर..अन्य शाळांना आदर्श

गौरव पोंक्षे | माखजन
संगमेश्वर तालुक्यातील माखजन पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाच्या माखजन इंग्लिश स्कूल मध्ये पोषण आहारात मिसळ पाव विद्यार्थ्यांना मिळाल्याने,विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आंनद दिसत होता.पोषण आहारात असे नवंविध पदार्थ विद्यार्थ्यांना वाढले जात असल्याने शासनाकडून मिळणाऱ्या आर्थिक तरतूदीतून विद्यार्थ्यांच्या ताटात खूप काही वाढू शकतो.हा आदर्श माखजन इंग्लिश स्कूल ने अन्य शाळांसमोर घालून दिला आहे.
शासनाकडून येणारा निधी तुटपुंजा येतो, तांदुळासह अन्य धान्य अपुरे येते,आम्हालाच शाळेला खर्च करावा लागतो अशी रड चालू करून कांगावा अनेक ठिकाणी करून बनाव केला जातो.आमचेचे पैसे जातात,आमचेचे पैसे अडकले आहेत अशी अनेक वाक्य कानी पडतात पण हे साफ खोट असून. शासन योग्य पुरवठा आणि आर्थिक तरतूद करत असल्या चे माखजन इंग्लिश स्कूल च्या नियोजनातून दिसत आहे.
आलेला तांदूळ शाळेत न येता अन्य ठिकाणी पोषणासाठी गेल्याच्या बातम्या आजवर अनेक पाहायला मिळाल्या आहेत.विद्यार्थ्यांचे पोषण न करता आपल्या तुंबड्या भरणाऱ्या मुख्याध्यापकांच्या आणि संस्थाच्या पोलखोल करणाऱ्या बातम्या आणि कारवाया महाराष्ट्राला नवीन नाहीत. या साऱ्याला सध्या माखजन इंग्लिश स्कूल आदर्श ठरत आहे.
शासन फक्त पुरवठा केलेला शिधा ,आणि दिवसागणिक कागदावर खतवलेला शिधा, ह्याचाच हिशोब पहात आले आहे.परंतु आठवड्याला कागदावर खतवलेली अंडी ,राजगिरा लाडूं,केळी,लोणच,बिस्कीट,विविध मसाले,आणि पदार्थ प्रत्यक्ष विद्यार्थ्यांच्या जेव्हा ताटात वाढले जातात त्यावेळी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर असणारा आनंद शब्दात अवर्णनीय असतो.आणि शिक्षकांना मिळणारे समाधान वेगळेच असते.
विद्यार्थ्यांचे कुपोषण दूर होण्यासाठी केंद्राने ही योजना प्रथम अमलात आणली.म विविध राज्यात सुरु झाली.पण विद्यार्थ्यांचे पोषण होताना अनेक ठिकाणी विद्यार्थ्यांसह अन्य घटकांचे अधिक पोषण होत असल्याचे देखील पुढे आले आहे.याला कारण शासकिय यंत्रणा जबाबदार आहे.पुरवठा केलेला पोषण आहाराचा शिधा आणि प्रत्यक्ष होत असलेला वापर हा ,कागदावरील नुसता न तपासता शाळेत प्रत्यक्ष जाऊन अधिकाऱ्यानी तपासणी केली पाहिजे.पण अनेक ठिकाणी पोषण आहाराच्या बाबतीत,कुंपणच शेत खातंय अशी स्थिती अगदी जवळून पाहायला मिळते.
सध्या माखजन इंग्लिश स्कूल मध्ये पोषण आहारातील,आहाराविषयी सर्वत्र कौतुक होत आहे.मुख्याध्यापक महादेव परब,संस्था अध्यक्ष मनोज शिंदे यांचे अभिनंदन होत आहे.