कशेडी पोलीस चौकीजवळ दुचाकी अपघात; एक जण जखमी

मुंबई-गोवा महामार्गावर आणखी एक दुर्घटना 

खेड (प्रतिनिधी) : मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी पोलीस चौकीजवळ रविवारी २७ एप्रिल रोजी पहाटे दुचाकीचे नियंत्रण सुटल्याने अपघात झाला. या अपघातात एक जण जखमी झाला असून त्याला तातडीने उपजिल्हा रुग्णालय, कळंबणी येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पहाटे सुमारे ४.५० वाजण्याच्या सुमारास खेड येथून पुण्याच्या दिशेने जात असलेली दुचाकी क्रमांक एमएच १२ टीएम २४१८ ही महामार्गावरील कशेडी येथील वाहतूक पोलिस चौकीजवळ आली असता अचानक चालकाचा ताबा सुटल्याने दुचाकी अपघातग्रस्त झाली. या अपघाताची माहिती मिळताच भरणे नाका ब्रिजखाली सेवेत उभी असलेली जगद्गुरु रामनंदाचार्य श्री नरेंद्राचार्य जी संस्थान, नाणिज धाम यांची २४ तास अपघात मदतीसाठी कार्यरत विनामूल्य रुग्णवाहिका तात्काळ घटनास्थळी दाखल झाली. या अपघातात दुचाकीस्वार अविनाश बबन चिनकटे (वय ३०, रा. संगलट) हे जखमी झाले होते. रुग्णवाहिका चालक सुरज हंबीर यांनी तत्परता दाखवत जखमीला त्वरित उपजिल्हा रुग्णालय, कळंबणी येथे उपचारासाठी दाखल केले.