दोडामार्ग (प्रतिनिधी):
कोनाळकट्टा माध्यमिक विद्यालय येथे शिक्षण विस्तार अधिकारी सूर्यकांत नाईक यांचा सेवापूर्ती सन्मान सोहळा संपन्न झाला. “चाळीस वर्षांच्या प्रदीर्घ सेवेत त्यांनी विद्यार्थी आणि समाज घडवण्यासाठी केलेले प्रयत्न खरोखरच कौतुकास्पद आहेत. समाजप्रबोधन करताना त्यांनी ज्या ज्या गावात सेवा केली, तिथे गावकऱ्यांशी एकोपा निर्माण केला. आपल्या कार्यकाळात त्यांनी कर्तव्याला तडा जाऊ दिला नाही,” असे गौरवोद्गार जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत यांनी काढले.
दोडामार्ग तालुक्यातील प्राथमिक शाळा शिक्षक वर्ग आणि कोनाळकट्टा तिलारी खोरे माध्यमिक विद्यालय यांच्या वतीने आयोजित या सोहळ्यात सूर्यकांत नाईक व त्यांच्या पत्नी सौ. हेमलता नाईक यांचा जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत यांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला. यावेळी बोलताना कामत पुढे म्हणाले की, जरी नाईक पुढील महिन्यात सेवानिवृत्त होत असले, तरी त्यांनी समाज घडवण्याचे आपले योगदान भविष्यातही सुरू ठेवावे.
असे आवाहन केले
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन आणि स्वागत गीताने झाली. या सोहळ्याला अनेक मान्यवर उपस्थित होते, यावेळी प्रमुख अतिथी म्हणून
सुरेशभाई दळवी (माजी जि.प. अध्यक्ष तथा अध्यक्ष, तिलारी खोरे शिक्षण प्रसारक मंडळ)बाबुराव धुरी (शिवसेना जिल्हाप्रमुख) संजय सातार्डेकर (पंचायत समिती सदस्य)
निसार नदाफ (गटशिक्षण अधिकारी)
सौ. लोंढे व सौ. जोशी (केंद्र प्रमुख)
एन. एन. नाईक (भेडशी प्राचार्य)
विश्वनाथ सावंत (मुख्याध्यापक, कोनाळकट्टा प्रशाळा
या व्यतिरिक्त प्रदीप देसाई, सुधाकर बांदेकर, महेश नाईक, महेश काळे, विठ्ठल गवस, बाळासाहेब शेळके आणि तिलारी खोरे शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी उपस्थित अनेकांनी आपले मनोगत व्यक्त करून सूर्यकांत नाईक यांच्या कार्याचा गौरव केला आणि त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. नाईक यांच्या प्रामाणिक कार्यपद्धतीमुळे शिक्षण विभागात त्यांचा मोठा दबदबा आणि आदर असल्याचे यावेळी अधोरेखित झाले.











