करंबेळे येथे शाळेला संगणक व प्रिंटर भेट; ई-लर्निंग वर्गाचे उद्घाटन

गौरव पोंक्षे माखजन:
संगमेश्वर तालुक्यातील करंबेळे धावडेवाडी मराठी शाळेच्या शैक्षणिक विकासासाठी शिक्षक पदवीधर आमदार श्री निरंजन डावखरे यांच्या माध्यमातून शाळेला संगणक , तसेच भाजपा संगमेश्वर दक्षिण तालुकाध्यक्ष श्री. रुपेश कदम यांच्या माध्यमातून प्रिंटर देण्यात आला. त्यानंतर शाळेतील नव्याने सुसज्ज करण्यात आलेल्या ई-लर्निंग वर्ग खोलीचे
उद्घाटन भाजपा महिला मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष सौ. रुपाली रुपेश कदम यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले.
या कार्यक्रमावेळी ,पंचायत सभापती शर्वरी वेल्ये,पंचायत समिती सदस्य श्री मंगेश बांडागळे,श्री.दत्ता चव्हाण, युवा मोर्चा तालुका उपाध्यक्ष,श्री अक्षय शिंदे,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री.शशी धावडे, वांझोळे गावच्यासरपंच सौ. निधी पंदरे यांच्यासह ग्रामस्थ, पालक व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी मनोगत व्यक्त करताना सौ. रुपाली कदम म्हणाल्या
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही आधुनिक शिक्षणाच्या सुविधा मिळाल्या पाहिजेत, हा आमचा सातत्याने प्रयत्न आहे. आज ई-लर्निंग वर्गाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना डिजिटल शिक्षणाची नवी संधी उपलब्ध होत आहे. शिक्षण हा समाज परिवर्तनाचा पाया असून विद्यार्थ्यांनी या सुविधेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा. भविष्यातही शाळांच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही कटिबद्ध राहू.असे आश्वस्त केले.या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने शिक्षण घेण्याची संधी उपलब्ध झाली असून शाळेच्या शैक्षणिक गुणवत्तेत भर पडणार असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.