संंगमेश्वर तालुक्याचा बारावीचा निकाल ९२.७४ टक्के

देवरूख (प्रतिनिधी)

बारावीचा निकाल शनिवारी जाहीर झाला आहे. संगमेश्वर तालुक्याचा बारावीचा निकाल ९२.७४ टक्के इतका लागला असून दोन महाविद्यालयांचा निकाल १०० टक्के लागला आहे. परीक्षेसाठी तालुक्यातून १ हजार ३९३ मुले प्रविष्ठ झाली होती. यापैकी १ हजार २९२ मुले उत्तीर्ण झाली आहेत.

देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाच्या आठल्ये-सप्रे-पित्रे कनिष्ठ महाविद्यालयाचा उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेचा (एच. एस. सी.) निकाल ८८.७५% लागला आहे. महाविद्यालयातून गुणानुक्रमे यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचा शाखानुसार निकाल खालील प्रमाणे:-
कला शाखा: पहिला: अनय रामचंद्र घनवटकर, दुसरा: स्वरूप धिरेंद्र मांजरेकर, तृतीय: रिया संतोष पड्ये, चौथा: अपूर्वा उदय भोसले, पाचवा: कौशिक महेश लिंबूकर. वाणिज्य शाखा: पहिला: पायल प्रितम बांडागळे, दुसरा: प्रणित मिलिंद मांडवे, तिसरा : अनुष्का अशोक घाणेकर, चौथा: प्रणाली दीपक पर्शराम, पाचवा: यश सुनील पर्शराम. एम. सी. व्ही. सी. शाखा: पहिला: आकांक्षा निलेश घवाळी, द्वितीय: प्रेरणा लक्ष्मण शिंदे, तृतीय: पूर्वा दिनेश करंडे, सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थाध्यक्ष सदानंद भागवत, नेहा जोशी, कृष्णकुमार भोसले, शिरीष फाटक, सुजाता प्रभूदेसाई, प्राचार्य डॉ. नरेंद्र तेंडोलकर, उपप्राचार्य डॉ. सरदार पाटील, पर्यवेक्षक प्रा. एम. आर. लुंगसे, ग्रंथपाल प्रा. सुभाष मायंगडे, कार्यालयीन अधीक्षिका मिता भागवत, अक्षय भुवड, तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन करून भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

देवरूख शहरातील गुरुवर्य काकासाहेब सप्रे विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयाचा निकाल 98.03%लागला आहे.परीक्षेला बसलेल्या 102 विद्यार्थ्यांपैकी 100 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. कु. अल्फिन आरिफ मालिम हिने 79.83%गुण मिळवत विज्ञान शाखेत सर्व प्रथम येण्याचा मान मिळवला. कु. परिघा अनंत कदम व कु.राईना जावेद वारोसे यांनी 77.33%गुण मिळवत विभागून द्वितीय क्रमांक मिळवला. कु. संस्कृती संजय रेडीज हिने 76.50% गुण मिळवत तृतीय क्रमांक पटकावला आहे. या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे शाळा समिती अध्यक्षा सौ. नेहाताई जोशी, मुख्याध्यापक श्री मधुकर कोकणी, पर्यवेक्षक अनंतकुमार मोघे तसेच सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.

साखरपा येथील महात्मा गांधी विद्यालय व बाबासाहेब कोलते ज्युनिअर कॉलेजचा बारावीचा निकाल ९२. ५५%लागला. एकूण ६० विद्यार्थी बारावीला बसले होते. त्यापैकी उत्तीर्ण ५३ विद्यार्थी झाले. ६ विद्यार्थी अनु्तीर्ण झाले. तर एक विद्यार्थी गैरहजर होता. यामध्ये बारावी संयुक्तचा निकाल ८९.८३% लागला असून सायली सुनील बेर्डे ७३. ५०%, वैष्णवी विजय खांदारे ६५.५०%, सुजय अशोक खांदारे ६१. ८३% गुण मिळवून प्रथम तीन आल्या. बारावी विज्ञान शाखेचा निकाल ९७. १४% लागला असून यामध्ये तैवाज करीम गडकरी ६५. ८३%, वेदांत गोविंद गुरव ६३%, नम्रता दत्ताराम शिवगण ५६. १७% या प्रथम तीन विज्ञात शाखेत आल्या. यशस्वी विद्यार्थ्यांचे स्थानिक स्कूल कमिटी, शाळा व्यवस्थापन समिती, विद्यार्थी सुरक्षा समिती, मुख्यद्यापक सर्व शिक्षक वृंद, पालक वर्ग यांनी कौतुक केले आहे. निवे बुद्रुक कला व विज्ञान या दोन्ही शाखांचा शाखावार निकाल पहाता, विज्ञान शाखेने ९८.११ टक्के, तर कला शाखेने ९७.५६ टक्के यश संपादन केले आहे. हे नेत्रदीपक यश म्हणजे महाविद्यालयीन विद्यार्थी आणि शिक्षक मंडळी यांच्या परिश्रमाची पोचपावती आहे.

दलित सेवा संस्था संचलित, माध्यमिक आश्रमशाळा व कला-विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय निवे बु. (ता. संगमेश्वर) या महाविद्यालयाने उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेत (फेब्रुवारी २०२६) दैदीप्यमान यश संपादन केले आहे. विशेष म्हणजे कला
आणि विज्ञान या दोन्ही शाखांच्या विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी करत महाविद्यालयाचा एकूण निकाल ९७.८७ टक्के लावला आहे. या घवघवीत यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत यादव संस्थेचे सर्व पदाधिकारी, मुख्याध्यापिका तसेच सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे व त्यांच्या पालकांचे हार्दिक अभिनंदन केले आहे. माध्यमिक आश्रम शाळा कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय निवे बुद्रुक येथे सर्व वर्गात नवीन प्रवेश देण्याचे काम दररोज सुरू असून पालक आणि विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

संगमेश्वर व्यापारी पैसा फंड संस्था संचलित पैसा फंड इंग्लिश स्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालय संगमेश्वरच्या बारावी विज्ञान शाखेचा निकाल शंभर टक्के लागला असून वाणिज्य शाखेचा निकाल९७:६५ तर कला शाखेचा निकाल ४४:४४ टक्के लागला आहे. सर्व यशस्वी विद्यार्थी आणि मार्गदर्शक शिक्षकांचे संस्था अध्यक्ष अनिल शेट्ये, उपाध्यक्ष किशोर पाथरे, सचिव धनंजय शेट्ये, सदस्य संदीप सुर्वे, रमेश झगडे मुख्याध्यापक सचिनदेव खामकर पर्यवेक्षक प्रकाश दळवी यांनी अभिनंदन केले आहे.

इयत्ता बारावी विज्ञान शाखेत प्रथम क्रमांक वेदा शैलेंद्र चिचकर ८०:१७ टक्के , द्वितीय क्रमांक ऋतिका रामदास चव्हाण ६४:८३ टक्के , तृतीय क्रमांक दीक्षा दशरथ घेवडे ६४:२३ टक्के , चतुर्थ क्रमांक दीक्षा दत्ताराम डिके ६२ टक्के , पाचवा क्रमांक इशा हंसराज शिंदे ६१:८३ टक्के , वाणिज्य शाखा – प्रथम क्रमांक श्रुतिका शिवाजी सावंत ८३:३३ टक्के, द्वितीय क्रमांक दीक्षा अशोक कदम ७४:८३ टक्के, तृतीय क्रमांक वेदिका महेश चरकरी ७२:५० टक्के, चतुर्थ क्रमांक सानिका दत्ताराम कळंबटे ६९:८३, पाचवा क्रमांक श्वेता महेश जाधव ६९:३३ टक्के, कला शाखा प्रथम क्रमांक संकेत संजय गुरव ५१ टक्के, द्वितीय क्रमांक पूजा विजय जाधव ३९:६७, तृतीय क्रमांक सौरभ विठोबा गुरव ३९:५०, चतुर्थ क्रमांक रिया मुकेश पवार ३८:६७ व्यापारी पैसा फंड संस्था संचलित पैसा फंड इंग्लिश स्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालय संगमेश्वर येथे सर्व वर्गात नवीन प्रवेश देण्याचे काम दररोज सुरू असून पालक आणि विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशालेचे मुख्याध्यापक सचिनदेव खामकर यांनी केले आहे.