गुहागर प्रतिनिधी:
गुहागर तालुक्यातील चिखली साळवीवाडी येथे मंगळवार दि. १२ मे ते शुक्रवार दि. १५ मे दरम्यान चार दिवस स्वामी समर्थ मठाचा ४१ वा वर्धापन दिन सोहळा आयोजित केला आहे. यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत.
मंगळवार दि. १२ मे रोजी सकाळी ९ वाजता गणेशयाग, महाआरती, भंडारा. सायंकाळी ७.३० नामस्मरण, महाआरती, इतर धार्मिक कार्यक्रम. बुधवार १३ मे सकाळी ९ वाता लक्ष्मीयाग, महाआरती, भंडारा. संध्याकाळी ७.१५ नामस्मरण, महाआरती, इतर धार्मिक कार्यक्रम. गुरुवार १४ मे रोजी सकाळी ९ वाजता दत्तयाग, महाआरती, भंडारा. सायंकाळी ७.३० वाजता नामस्मरण, महाआरती, इतर धार्मिक कार्यक्रम. शुक्रवार दि. १५ मे रोजी सकाळी ७ वाजता स्वामी समर्थांचा अभिषेक, पूजा, सकाळी ९ वाजता स्वामी समर्थ नामावली, होमहवन, महाआरती, भंडारा सायंकाळी ५ वाजता स्वामी समर्थांची पालखी मिरवणूक, ९.३० वाजता महाआरती, नामस्मरण, भंडारा. रोज रात्री हरिपाठ, भजन, कीर्तन, भक्तीगीतांचे कार्यक्रम होणार आहेत. स्वामी समर्थ भक्तांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.












