कणेरीवाडी येथे जेसीबीने उध्वस्त केल्या गावठी दारू निर्मितिच्या भट्ट्या…

प्रतिनिधी /रोहन कांबळे :कोल्हापूर: कणेरीवाडी परिसरात सुरू असलेल्या बेकायदेशीर गावठी दारू निर्मितीवर गोकुळ शिरगाव पोलिसांनी मध्यरात्री धडक कारवाई करत संपूर्ण भट्ट्या उध्वस्त केल्या. एपीआय रविराज फडणीस यांच्या नेतृत्वाखाली पथकाने नियोजनबद्ध छापा टाकून दारू निर्मितीचा मोठा साठा उध्वस्त केला. या कारवाईदरम्यान दारू तयार करण्यासाठी वापरले जाणारे रसायन, ड्रम व अन्य साहित्य जप्त करण्यात आले. त्यानंतर जेसीबीच्या सहाय्याने दारू भट्ट्या व साठा पूर्णपणे नष्ट करण्यात आला.

या कारवाईमुळे परिसरातील बेकायदेशीर दारू व्यवसायाला मोठा आळा बसल्याचे चित्र आहे.

स्थानिकांकडून मिळालेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी ही करावी आखली होती. अचूक माहितीच्या आधारे छापा टाकण्यात आला असून संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.एपीआय रविराज फडणवीस हे कर्तव्यदक्ष व धाडसी अधिकारी म्हणून ओळखले जातात त्यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी यापूर्वीही अनेक प्रभावी कारवाया करत कायदा व सुव्यवस्था राखली आहे. फडणीस यांच्या कार्य शैलीमुळे परिसरात त्यांना रियल सिंघम अशी ओळख मिळाली आहे.

पुढील तपास गोकुळ शिरगाव पोलीस करत आहेत.

या धाडसी कारवाईमुळे परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे