मराठा समाज सेवा मंडळ मराठवाडी कुवे आणि वालावलकर रुग्णालय डेरवण यांचे आयोजन
लांजा (प्रतिनिधी): मराठा समाज सेवा मंडळ मराठवाडी कुवे आणि बी के वालावलकर रुग्णालय डेरवण यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार दिनांक ९ मे रोजी कुवे मराठवाडी येथे महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
कुवे मराठवाडी येथील विठ्ठल रखुमाई मंदिर या ठिकाणी हे महा आरोग्य शिबिर होणार आहे. या शिबिरासाठी नामवंत तज्ञ वैद्य अधिकारी उपस्थित राहुल रुग्णांची तपासणी करणार आहेत. अधिक माहितीसाठी योगेश सुर्वे ९०२८७८२९५९ यांच्याशी संपर्क साधावयाचा आहे.
तरी या महाआरोग्य शिबिराचा लोकांनी लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे













