उबाठा चे शेकडो कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश
गौरव पोंक्षे माखजन:
महाराष्ट्राचे उद्योग मंत्री,तथा जिल्ह्याचे पालक मंत्री उदय सामंत आणि लांजा राजापूर चे आमदार किरण उर्फ भैय्या सामंत यांची १० मे रोजी माखजन नजीक नायशी येथे जाहीर सभा होणार आहे.यामध्ये उबाठा चे शेकडो कार्यकर्ते शिवसेना एकनाथ शिंदे गटात पक्ष प्रवेश करणार आहेत.
या जाहीर सभेचे आयोजन एकनाथ शिंदे गटाचे माजी सभापती दिलीप सावंत आणि मनोज शिंदे व सहकारी यांनी केले आहे.यावेळी माजी आमदार सुभाष बने,माजी आमदार सदानंद चव्हाण,राजेंद्र महाडिक,विलास चाळके,रोहन बने,कृष्णा हरेकर, आदी प्रमुख नेते मंडळी उपस्थित राहणार आहेत.यावेळी उबाठा चे अजय चव्हाण आणी त्यांच्या सोबत असंख्य कार्यकर्ते जाहीर पणे एकनाथ शिंदे गटात प्रवेश करणार आहेत.यावेळी माखजन पंचक्रोशीतील उबाठा चे काही प्रमुख कार्यकर्ते देखील एकनाथ शिंदे गटात प्रवेश करणार आहेत.
विधानसभा मतदार संघांच्या नव्याने होणाऱ्या रचनेला अनुसरून हा पक्ष प्रवेश महत्वपूर्ण मानला जात आहे.या भागात एकनाथ शिंदे गटाची ताकद पुन्हा वाढली आहे.बऱ्याच काळानंतर एकनाथ शिंदे गटातील बड्या नेत्यांची जाहीर् सभा माखजन पंचक्रोशीत होत असल्याने कार्यकर्त्यात देखील नव चैतन्य आले आहे.१०मे ला सायंकाळी ६ वाजता नायशी हायस्कुल च्या सभागृाहत ही सभा होणार आहे. या पक्ष प्रवेशाकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.











