सलग आठव्या वर्षी यशाची परंपरा कायम
शिरगाव (प्रतिनिधी) : मार्च २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (एसएससी) परीक्षेत माध्यमिक विद्यामंदिर साळशीने शंभर टक्के निकालाची परंपरा कायम राखत सलग आठव्या वर्षी उल्लेखनीय यश संपादन केले. यावर्षी मुलींनी गुणवत्तेत बाजी मारली.
या प्रशालेतील हिमानी चंद्रकांत घाडी हिने ९१ टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला. तनिषा संजय गावकर हिने ८६.२० टक्के गुणांसह द्वितीय क्रमांक, तर जान्हवी प्रशांत गावकर हिने ८५.५० टक्के गुण मिळवत तृतीय क्रमांक प्राप्त केला.
या वर्षी प्रशालेतून १३ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याने प्रशालेचा निकाल शंभर टक्के लागला.
या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष सत्यवान सावंत, संस्था पदाधिकारी, स्कूल कमिटी चेअरमन सत्यवान भोगले व सदस्य, मुख्याध्यापक संजय मराठे, सहशिक्षक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी, पालक व ग्रामस्थ यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.













