BREAKING: चालता चालता मोबाईलवर रील्स पाहणे बेतले जीवावर

रत्नागिरीत मोबाईलचा भीषण स्फोट, तरुण जखमी!

रत्नागिरी | प्रतिनिधी
मोबाईलवर सोशल मिडियाच्या फेसबुकवर रिल बघत घरी चालत जात असताना मोबाईलचा स्फोट झाला. यामध्ये तरुण जखमी झाला. उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

सुशिल सुनिल रहाटे ( ३५, रा. कोळंबे, रत्नागिरी) असे जखमी तरुणाचे नाव आहे. ही घटना शुक्रवार 15 मे रोजी रात्री 10.30 वा. सुमारास फिनोलेक्स फाटा ते कोळंबे गाव रस्त्यावर घडली. सुशिल रहाटे याचे फिनोलेक्स फाटा येथे गॅरेज आहे. गॅरेजमधील काम आटोपून रात्री 10.30 वा.सुमारास तो चालत आपल्या कोळंबे गावी जात होता. चालताना मोबाईलवरिल रिल बघत असताना त्याच्या मोबाईलचा अचानकपणे स्फोट झाला. हातातील मोबाईल खाली पडला. मात्र त्याच्या बोटांना जखमा झाल्या आहेत. उपचारासाठी त्याला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल कऱण्यात आले आहे.