गावखडी गुरववाडी सामाजिक संस्थेच्या वतीने विविध स्पर्धाचे बक्षीस वितरण उत्साहात

गावखडी /वार्ताहर:
रत्नागिरीत तालुक्यातील गावखडी गुरववाडी सामाजिक संस्थेच्या वतीने विविध स्पर्धाचे बक्षीस वितरण करण्यात आले
तसेच क्रिकेट स्पर्धेत विजेता संघ रूद्र इलेव्हन, उपविजेता सुपर मेस्त्री संघ, रोख रक्कम चषक उपस्थित मान्य वराच्या हस्ते प्रदान करण्यात आले आहे
तसेच भव्य रंगमंच तयार करून त्याचे नामकरण सोमेश्वर जुगादेवी जाकादेवी मानूबाई या नावाने करण्यात आले आहे
यावेळी उपस्थित गावखडी गुरववाडी सामाजिक संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र गुरव,उपाध्यक्ष विजय गुरव, खजिनदार सुधाकर गुरव,स्थानिक अध्यक्ष रामचंद्र गुरव,विजय, पां.गुरव,दत्ताराम गुरव,जितेंद्र गुरव,प्रकाश गुरव,धनजय गुरव, हेमंत गुरव,प्रमुख पाहुणे मंगेश गुरव शाखा अध्यक्ष गुरव ज्ञाती समाज उपस्थित होते
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक नंदकुमार गुरव व स्वागत विजय गुरव यांनी केले
अध्यक्षीय भाषणात राजेंद्र. य.गुरव यांनी वाडीच्या सांस्कृतिक सामाजिक कार्यात आपण सर्वानी एकत्र येऊन सहभागी हावे, मुलाच्या विविध कलागुण प्रोत्साहन,गावखडी गुरववाडी सामाजिक संस्थेच्या माध्यमातून अनेक उपक्रम राबविण्यात येत आहेत