चार पानी सुसाईड नोटमधे आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्यांची लिहून झाले होते बेपत्ता
शिरगाव पोलिस ठाण्यात संबंधित संशयितांवर गुन्हा दाखल
चिपळूण । राकेश कोळी
चिपळूण शहरातील एका बँकेच्या शाखेत कार्यरत असलेला ३३ वर्षीय युवक मुकुंद मुरलीधर पालांडे याचा मृतदेह तीन दिवसांनी कोलकेवाडी हसरेवाडी स्मशान भूमी लगत धरण परिसरात सापडला
बेपत्ता होण्यापूर्वी मुकुंद यांनी एक सुसाईड नोट लिहिली होती. त्यात आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्यांची नावे लिहिली होती. यामुळे खळबळ उडाली होती. तीन दिवस पोलीस मुकुंद पालांडे यांचा शोध घेत होते. त्यांचा मृतदेह कोलकेवाडी धरणात सापडला
यानंतर त्याला आत्महत्या करण्यास प्रवृत केल्याप्रकरणी त्याच्या चार पानी सुसाइड नोटीत उल्लेख असलेल्या चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला याबाबत अलोरे शिरगाव पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक भरत पाटील अधिक तपास करीत आहेत













