लांजा तालुक्यातील भांबेड चे अमोल रेडीज राजा शिवाजी सिनेमात .

लांजा :तालुक्यातील भांबेड गावचे सुपुत्र बल्लाळ गणेश देवस्थान प्रभानवल्ली चे अध्यक्ष, अमोल रंगयात्री लांजा,नवयुग उत्कर्ष युवक मंडळ भांबेड चे व व्यापारी संघटना भांबेड चे संस्थापक. श्रीराम विद्यालय वेरवलीचे शालेय समिती व व्यवस्थापन समिती अध्यक्ष,लांजा तायक्वांडो अकादमीचे उपाध्यक्ष, जिल्हा कलाकार मानधन समितीचे सदस्य, अमोल रेडीज हे नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या राजा शिवाजी सिनेमात भूमिका साकारत आहेत.
तसेच त्यांचे सुपर डूपर, बाप्या हे सिनेमे सुद्धा प्रदर्शित झाले असून गतवर्षी प्रदर्शित झालेल्या रोहन मापुस्कर दिग्दर्शक असलेल्या,एप्रिल मे 99 सिनेमाने कान्स फिल्म महोत्सवात हजेरी लावली.आदिशेष हा सिनेमा लवकरच प्रदर्शित होईल. लेखक दिग्दर्शक सिनेनाट्य अभिनेता म्हणून त्यांनी महाराष्ट्रात आपले स्थान निर्माण केले आहे.खेडेगावातून हौशी रंगभूमीवर काम करत एकांकिका स्पर्धा, एकपात्री अभिनय यात अनेक बक्षिसे घेत लिखाण सुरू केलं, जिहाद, मुखवटे, दि गेम ऑफ डेस्टिनी, ईठ्ठला ही नाटके,चटका हा कथासंग्रह, अनेक शॉर्ट फिल्म, फिल्म चे लिखाण त्यांनी केले असून लिखाण व अभिनय क्षेत्रात अनेक पारितोषिके मिळवली आहेत.
हा सर्व प्रवास करताना व्यावसायिक सिनेमा पर्यंतची मजल त्यांनी मारली.या सर्व सिनेमा प्रवासात दिग्दर्शक रमेश मोरे, दिग्दर्शक व कास्टिंग डायरेक्ट रोहन मापुस्कर, दिग्दर्शक जयंत गिलाटर ,
डॉ भगवान नारकर, दिग्दर्शक असित रेडीज आशा अनेक मान्यवरांची मदत झाली.