गौरव पोंक्षे माखजन:
संगमेश्वर तालुक्यातील आरवली येथे श्री देव आदित्य नारायण मंदिर ब्राह्मण वाडी येथे पुरुषोत्तम मासाच्या निमित्ताने कीर्तनसंध्या होणार आहे.२७ रोजी सायंकाळी ५ वाजता मंदिरात हे कीर्तन होणार आहे.कीर्तनकार म्हणून,रत्नागिरीच्या नवोदित कीर्तनकार ह.भ.प. सौ सायली दामले असणार आहेत.त्यांना हार्मोनियम ची साथ पराग लघाटे तर तबल्याला सुरज पाटणकर असणार आहेत.
कीर्तन सुरु होण्यापूर्वी सामूहिक विष्णू सहस्त्रनाम पठण होणार आहे.कीर्तनसंध्या चे आयोजन श्री जयवंत परांजपे आणि परिवार यांनी केले आहे.कीर्तनसंध्येला व सामूहिक विष्णू सहस्त्रनाम पठणाला उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे.













