दापोली | प्रतिनिधी : कोकण पर्यटनाचे भीष्माचार्य डॉ. चंद्रकांत मोकल, संजय यादवराव, प्रशिक्षण विभागाचे प्रमुख रिगल कॉलेजचे संजय शिर्के, कोकण क्लब पर्यटन विभागाचे कार्याध्यक्ष प्रसाद कोळंबकर, आर्किटेक्ट मकरंद केसरकर, माधव महाजन, फायनान्स एक्सपर्ट संदीप भोसले, विकास शेट्ये, युयुत्सु आरते, राजश्री यादवराव , नरेश पेडणेकर ,प्रबोध जोशी ,आशिष अमृते ,सचिन कारेकर, सागर सावलीचे मंगेश मोरे ,सागर मोरे, प्राध्यापक सतीश कदम,दीपक विचारे, मयुरेश शेठ आदी मान्यवरांच्या उपस्थितीत
दापोली येथे कोकण पर्यटन परिषद अतिशय उत्साहात पार पडली.
लोकसभागातून दापोली पर्यटनाचे स्वरूप बदलण्याचा व पर्यावरण पूरक शाश्वत पर्यटन साठी संघटितपणे काम करण्याचा महत्त्वाचा ठराव या परिषदेमध्ये झाला. सर्वांनी एकत्र येऊन आपल्या गावातील आपल्या तालुक्यातील पर्यटन व येथील पर्यटन व्यवस्था जगभर कशा नेता येतील या दृष्टीने मार्केटिंग, ब्रॅण्डिंग, बँकिंग, पतपुरवठा, नाविन्यपूर्ण व पर्यावरण पूरक पर्यटन या सर्व विषयांवर दिवसभर अतिशय चांगली चर्चा या परिषदेमध्ये झाली. भविष्यात देखील असे उपक्रम राबविले जातील असे एकमुखाने ठरवण्यात आलं आहे.












