सरमळे येथील अपघातातग्रस्त महिलेचे उपचारा दरम्यान निधन

(प्रतिनिधी )

ओटवणे सावंतवाडी मार्गांवर ओटवणे कापई वाडी येथे काल दुपारी झालेल्या महिंद्रा पिकअप (MH 51C 0361)आणि प्लेझर दुचाकी यांच्यात झालेल्या अपघातात गंभीर जखमी सरमळे कुंभार वाडी येथील सीमा सचिन तळवडेकर वय ४२हिचे गोवा बांबूळी येथे उपचारा दरम्यान दुःखद निधन झाले. झालेल्या अपघातात तीच्या पायाला गंभीर दुखापत झाली होती.गंभीर अवस्थेत तिला आणि तिच्या मुलाला सावंतवाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले.मोठ्या प्रमाणात झालेला रक्तस्त्राव आणि गंभीर अवस्थेमुळे सीमा तळवडेकर हिला सावंतवाडी येथून गोवा बांबूळी येथे हलविण्यात आले होते.तिथे त्यांचे दुःखद निधन झाले.

हा अपघात दुपारी साडे बारा च्या सुमारास घडला होता त्याचा मुलगा आदिराज तळवडेकर आपल्या ताब्यातील प्लेझर दुचाकी घेऊन सावंतवाडी येथून सरमळे येथे घरी येत होता.त्याच वेळी ओटवणे कापई वाडी येथे अवघड वळणावर महिंद्रा बोलेरो ला त्याची जोरदार धडक बसली होती.अखेर उपचार सुरु असताना त्यांचे दुःखद निधन झाले त्यांच्या पच्छात पती, एक मुलगा, मुलगी सासू सासरे दीर असा मोठा परिवार आहे केसरी के एस आर अक्वेरियम मधील सुपर वायझर सचिन तळवडेकर यांच्या त्या पत्नी होय त्यांच्या आकस्मिक निधनाची माहिती मिळताच सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.