देवगड l प्रतिनिधी :माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांच्या अमृतमहोत्सवी वर्ष पदार्पणानिमित्त तसेच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधानपदाच्या कारकिर्दीला १२ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल भाजप देवगड-जामसंडे शहरच्या वतीने बुधवारी (दि. १० जून) विविध सामाजिक व लोकोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.
यावेळी माजी आमदार अजितराव गोगटे, ज्येष्ठ नेते बाळ खडपे, मंडल अध्यक्ष राजा भुजबळ, जिल्हा सचिव प्रकाश गोगटे, सरचिटणीस योगेश चांदोस्कर, शहराध्यक्ष वैभव करंगुटकर, नगरसेवक गटनेते शरद ठुकरुल, कोषाध्यक्ष राजेंद्र वालकर, युवा मोर्चा शहराध्यक्ष दया पाटील, महिला पदाधिकारी प्रियांका साळस्कर, महिला शहराध्यक्षा तन्वी शिंदे, माजी शहराध्यक्ष योगेश पाटकर, मृणाली भडसाळे, प्राजक्ता घाडी, नगरसेवक रोहन खेडेकर, चंद्रकांत कावले, उपनगराध्यक्षा मिताली सावंत, नगरसेविका मनिषा जामसंडेकर, शक्तिकेंद्र प्रमुख सुभाष धुरी, गणपत गावकर, माधव कुळकर्णी, माजी नगरसेवक संजय तारकर, उमेश कणेरकर, बापू जुवाटकर, ज्ञानेश्वर खवळे, व्ही.सी. खडपकर, दीपक कांबळी, विजय कदम आदी पदाधिकारी, कार्यकर्ते व लोकप्रतिनिधी उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात जामसंडे गावचे ग्रामदैवत आई दिर्बादेवी मंदिरात सर्वांच्या उपस्थितीत ओटी भरण्याच्या कार्यक्रमाने करण्यात आली.
त्यानंतर प्रभाग क्रमांक १४ मध्ये योगेश पाटकर यांच्या सौजन्याने एका गरीब व गरजू महिलेला घर बांधकामासाठी मदत करण्यात आली. तसेच त्या महिलेला घरकुलाचे हस्तांतरण करण्यात आले. याचबरोबर रानडे कॉलनी व श्रीकृष्ण नगर येथे नागरिकांच्या सोयीसाठी प्रत्येकी एक अशा एकूण दोन बाकड्यांचे (बेंचेस) लोकार्पण करण्यात आले.
यावेळी देवगड-जामसंडे येथील महावितरण (MSEB) वायरमन कर्मचाऱ्यांना पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर रेनकोटचे वाटप करण्यात आले.
प्रभाग क्रमांक १ मधील खाडीकिनारी पर्यटक व नागरिकांच्या सुविधेसाठी वैभव करंगुटकर यांच्या सौजन्याने दोन बाकडे बसविण्यात आली. तसेच आप्पासाहेब धर्माधिकारी सद्गुरू बैठक, जामसंडे येथे बसण्यासाठी दोन बाकड्यांची व्यवस्था वैभव करंगुटकर व दया पाटील यांच्या सौजन्याने करण्यात आली.
याशिवाय प्रभाग क्रमांक ६ मधील तेलीवाडी बसस्टॉप येथे नागरिकांच्या सोयीसाठी एक बाकडे बसविण्यात आले. हा उपक्रम योगेश चांदोस्कर यांच्या सौजन्याने राबविण्यात आला.
या विविध सामाजिक व लोकोपयोगी उपक्रमांमुळे नागरिकांनी समाधान व्यक्त करत भाजप देवगड-जामसंडे शहरच्या कार्याचे कौतुक केले.












